तो दिवस दूर नाही जेव्हा भारत गरिबीमुक्त होईल; PM Narendra Modi यांचा विश्वास

41

भारत मंडपम येथे आयोजित भारत यंग लीडर्स डायलॉग 2025 (Bharat Young Leaders Dialogue 2025) कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, तो दिवस दूर नाही जेव्हा संपूर्ण भारत गरिबीमुक्त होईल. ते म्हणाले, “विकसित भारताच्या (Developed India) या प्रवासात आपल्याला दररोज नवीन उद्दिष्टे ठरवायची आहेत आणि ती साध्य करायची आहेत. तो दिवस दूर नाही जेव्हा भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे ध्येय गाठेल. 10 वर्षात देशाने 25 करोड जनतेला गरीबीतून बाहेर काढले आहे. ज्या वेगाने आपण जात आहोत, तो दिवस दूर नाही जेव्हा संपूर्ण भारत गरिबीमुक्त होईल. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त (Swami Vivekananda Jayanti) राष्ट्रीय युवा दिनानिमित्त (National Youth Day) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.   

‘भारताला विकसित देश होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही’
पीएम मोदी पुढे म्हणतात, ‘आज येथे उपस्थित तरुणांशी बोलत असताना मला विकसित भारताचे चित्रही दिसत आहे. विकसित भारतात आपल्याला काय पहायचे आहे? आपल्याला कोणत्या प्रकारचा भारत बघायचा आहे? जिथे चांगली कमाई आणि चांगल्या अभ्यासाच्या अधिकाधिक संधी असतील… फक्त बोलून आपण विकास करू का?… जेव्हा प्रत्येक निर्णयाचा निकष एकच असतो, जेव्हा आपल्या प्रत्येक पावलाची दिशा विकसित भारत असते, तेव्हा जगातील कोणतीही शक्ती आपल्याला विकास करण्यापासून रोखू शकत नाही.’

(हेही वाचा – भाजपमध्ये ज्यांना श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र समजला नाही त्यांची अवस्था सर्वांनी पाहिली; CM Devendra Fadnavis यांचे विधान)

‘भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार’
‘मी लाल किल्ल्यावरून 1 लाख नवीन तरुणांना राजकारणात आणण्याबाबत बोललो आहे. तुमच्या सूचना अंमलात आणण्यासाठी राजकारण हेही एक उत्तम माध्यम असू शकते. मला विश्वास आहे की, तुमच्यापैकी अनेकजण राजकारणातही उतरतील. विकसित भारताच्या या प्रवासात आपल्याला रोज नवनवीन ध्येये निश्चित करायची आहेत आणि ती साध्य करायची आहेत.
असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. 

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.