NCP : घड्याळाचे काटे कोणत्या दिशेला फिरणार?; ३० सप्टेंबरला राष्ट्रवादीच्या भवितव्याचा निर्णय

त्यानंतर मूळ राष्ट्रवादी आमचीच, असा दावा दोन्ही गटांकडून सुरू झाला.

144
NCP : घड्याळाचे काटे कोणत्या दिशेला फिरणार?; ३० सप्टेंबरला राष्ट्रवादीच्या भवितव्याचा निर्णय
NCP : घड्याळाचे काटे कोणत्या दिशेला फिरणार?; ३० सप्टेंबरला राष्ट्रवादीच्या भवितव्याचा निर्णय

अजित पवार यांच्यासोबत ३८ हून अधिक आमदारांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले झाली. त्यानंतर मूळ राष्ट्रवादी आमचीच, असा दावा दोन्ही गटांकडून सुरू झाला. त्यामुळे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेले. निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर ३० सप्टेंबरपासून प्रत्यक्ष सुनावणी घेतली जाणार आहे.

राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याआधीच अजित पवार यांनी निवडणूक आयोगाला मेलद्वारे आपणच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे कळवले होते. त्यानंतर आयोगाने दोन्ही गटांना नोटीस बजावून उत्तरे मागवली होती. आयोगाने ८ सप्टेंबरपर्यंतची मुदत शरद पवार यांच्या गटाला दिली आहे. पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे भक्कम पुरावे माझ्याकडे आहेत, असा दावा शरद पवार गटाकडून केला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे कोणत्या दिशेने फिरतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

दरम्यान, शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष असून, पक्षात कोणत्याही प्रकारची फूट पडली नसल्याचा दावा शरद पवार गटाकडून केला जाणार आहे. निवडणूक आयोगातील लढाईसाठी पवारांनी आपली फौज कामाला लावली असून, जयंत पाटील त्याचे नेतृत्व करीत आहेत. स्वतः पवार प्रत्येक अपडेटवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली.

(हेही वाचा – Powai Murder : पवईत प्रशिक्षणार्थी हवाई सुंदरीची गळा चिरून हत्या, पोलिसांची ४ पथके आरोपीच्या मागावर)

राष्ट्रवादी आमचीच – प्रफुल्ल पटेल
  • याविषयी अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल म्हणाले, निवडणूक आयोगात ३० सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत आहे. त्यानंतर सुनावणी होईल. त्यानंतर १५ ते २० दिवसात निर्णय होऊन आमच्या बाजूने निकाल लागेल. कारण ४३ आमदारांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. सर्वाधिक लोक अजितदादांना पाठिंबा देत असल्याने आम्हाला पक्ष आणि चिन्ह मिळेल याबाबत विश्वास आहे.
  • आम्ही घेतलेली भूमिका स्पष्ट आहे. आम्ही एनडीएचे घटक म्हणून काम करणार आहोत. आमच्या तिन्ही पक्षांत समन्वय आहे. तीन पक्ष एकत्रित येतात तेव्हा काही गोष्टींमध्ये अडचणी येतात; मात्र त्यावर तोडगा काढला जातो, असेही पटेल यांनी सूचित केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.