शिवसेना आणि राष्ट्रवादीचा निर्णय ५० ते ६० वर्षात लागेल; Uddhav Thackeray यांचे न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

145
शिवसेना आणि राष्ट्रवादीचा निर्णय ५० ते ६० वर्षात लागेल; Uddhav Thackeray यांचे न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी बांग्लादेशातील स्वतंत्र्य अधोरेखित केले. परंतु, तेथील पंतप्रधान, सर न्यायाधिशांना राजीनामा द्यावा लागला आहे. खरंतर भारताने बांग्लादेशाला स्वतंत्र्य मिळवून दिले. त्याच भारतात भूतकाळात डोकावताना रामशास्त्री प्रभूणे यांची आठवण येते. देशातील न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास असून शिवसेना आणि राष्ट्रवादीचा निर्णय येत्या ५० ते ६० वर्षात लागेल, अशा शब्दांत भारतीय न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपस्थित केले आहे.

महाविकास आघाडीचा पदाधिकारी मेळावा शुक्रवार (१६ ऑगस्ट) रोजी षण्मुखानंद सभागृहात सकाळी पार पडला. या वेळी शरद पवार, शिवसेना नेते दिवाकर रावते, संजय राऊत, आदित्य ठाकरे, जयंत पाटील, काँग्रेसचे नेते नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, शेकापचे जयंत पाटील, खासदार प्रियंका चतुर्वेदी, अनिल देसाई, अरविंद सावंत, वर्षा गायकवाड, माजी खासदार विनायक राऊत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

(हेही वाचा – राहुल गांधी यांच्याकडे ब्रिटीश नागरिकत्व; Subramaniam Swamy यांनी दिले पुरावे)

या वेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, लोकसभेला संविधानाची लढाई लढलो. आताची निवडणूक सोपी नाही. धर्म रक्षणाची, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ही लढाई लढायची आहे. थेट आरपारची लढाई लढू. एकतर तू राहणार किंवा मी राहणार अशा शब्दांत उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा एकेरीची भाषा केली आहे.

आरक्षणाच्या मर्यादा वाढविण्याचे अधिकार केंद्राला

मराठा, ओबीसी, धनगर समाजाला आरक्षण देणार, अशा घोषणा केल्या जात आहेत. समाजा समाजात तेढ निर्माण केले जात आहे. परंतु, आरक्षणाची मर्यादा वाढविण्याचे अधिकार केवळ केंद्र सरकारला आहेत. केंद्र सरकारने आरक्षणाची मर्यादा वाढविण्याचा कायदा करावा, महाविकास आघाडी त्यांना पाठिंबा देईल, असेही ठाकरे म्हणाले.

(हेही वाचा – इंडी आघाडी म्हणजे बलात्कारी बचाव आघाडी; Prem Shukla यांचा हल्लाबोल)

संकट अजून पूर्णपणे टळलेले नाही – शरद पवार

लोकसभेत संविधानाची भूमिका मांडली. त्या निवडणुकीत काही अंशी यश आले. परंतु, ज्यांच्या हातात देशाची सुत्रे आहेत. त्यांना संविधानिक संस्था, विचारधारा आणि तरतूदी याबाबत आस्था नाहीत. त्यामुळे देशावरील पूर्णपणे संकट अद्याप तरी टळलेले नाही, अशी सडेतोड भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार) नेते शरद पवार यांनी मांडली. महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निवडणुकांना सतर्कपणे सामोरे जावे, असा सल्ला दिला. महाविकास आघाडीच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.