महाविकास सरकारने शेवटच्या कॅबिनेटमध्ये नामांतराबाबत घेतलेले निर्णय हे बेकायदेशीर होते. कारण त्यावेळी सरकार अल्पमतात होतं. मग निर्णय अधिकृत कसे असणार? पण याबाबत आम्ही उद्या, शनिवारी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन नामांतराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेवटच्या कॅबिनेटमध्ये घेतलेल्या नामांतर आणि नामकरणाच्या निर्णयांना शिंदे सरकारने स्थगिती दिल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे दिसतेय. शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही महत्त्वाची घोषणा केली आहे.
(हेही वाचा – “…तर शिंदेच्या बाणापुढे ‘त्यांचा’ बाण टिकू शकणार नाही”)
Join Our WhatsApp Community