वंचितला सत्तेपासून वंचित रहायचे नाही; Prakash Ambedkar यांचा काय आहे प्लॅन ?

79
राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पूर्ण झाले असून, २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे राज्याच्या (Maharashtra Assembly Election Result 2024) सत्तेची चावी कुणाच्या हाती पडणार? याचं चित्र अवघ्या काही तासांतच स्पष्ट होणार आहे. बहुतांश एक्झिट पोल्सनी (Exit polls) राज्यात महायुती पुन्हा सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा केला असला तरी मतदारांचा नेमका कौल काय असणार, हे शनिवार २३ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष निकालानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे. अशातच वंचित बहुजन विकास आघाडीचे (Vanchit Bahujan Vikas Aghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. (Prakash Ambedkar)

(हेही वाचा – Assembly Election Result 2024 : स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेसाठी १० हजार पोलिस तैनात)

 

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आपल्या एक्सवर लिहीले आहे की, शनिवारी महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीला एखाद्या पक्षाला किंवा आघाडीला पाठिंबा देण्यासारखे संख्याबळ मिळाल्यास आम्ही जो सरकार स्थापन करून शकेल, अशा आघाडीसोबत जाणं पसंत करू,” असं प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचा पाठिंबा कोणाला असणार, हे शनिवारच्या निकालात कोणत्या आघाडीला किती जागा मिळतात, त्यावरच अवलंबून असणार आहे.

 दारमान, वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Elections) महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची चर्चा होती. मात्र, जागा वाटपाबाबत तोडगा न निघू शकल्याने वंचितने स्वबळावर निवडणूक लढवली होती. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही (Assembly Election 2024) आंबेडकर यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे.    

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.