सिंधुदुर्ग जिल्हाला दरिद्री म्हणायचे आज आपल्यामुळे विकसित!

मी जेव्हा आमदार झालो, तेव्हा जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न 30 हजार कोटी रुपये होते. आज ते दीड लाख वाढले आहे. दरडोई उत्पन्नामध्ये जिल्हा चौथ्या क्रमांकावर आहे.

80

1995 दरम्यान मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे काम टाटाकडे दिले. टाटाने मला रिपोर्ट दिला. त्यात त्यांनी हा जिल्हा पर्यटनातून विकसित होऊ शकतो, असे म्हटले. आता जी चिल्लर बाजारात फिरत आहे ‘आम्ही केलं आम्ही केलं’ म्हणत आहे, ते तेव्हा कुठेच नव्हते, तेव्हा जिल्ह्याला दरिद्री जिल्हा असे संबोधले जायचे. आज आपल्यामुळे जिल्ह्याचा विकास झाला, असे केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे म्हणाले.

चिपी विमानतळावर उद्यापासून वाहतूक सुरू होत आहे. 1990 साली मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आमदार झालो, तेव्हापासून विकासात्मक काम केले पाहिजे, यासाठी मी कार्यरत होतो. जिल्ह्याचा विकास कसा करावा, नागरिक सुविधा कोणत्या असाव्यात याची माहिती घेतली. त्यावेळी जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात प्यायला पाणी मिळायचे नाही, रस्तेही नव्हते, आरोग्य व्यवस्थाही तशीही होती. शाळा होत्या पण पुरेसे शिक्षक-विद्यार्थी नव्हते. जिल्ह्यात बेकारी देखील होती. भात शेती सोडता इतर काही साधने नव्हती. आंबा पिकावर अवलंबून राहता येत नव्हतं, तेव्हा जिल्ह्याला दरिद्री जिल्हा असे संबोधले जायचे असे मंत्री नारायण राणे म्हणाले.

(हेही वाचा : उद्धव ठाकरे, ज्योतिरादित्य शिंदेंपेक्षा मी सीनियर!)

नुसते तांदळाने इतके उत्पन्न वाढत नाही!

रस्त्याच्या चौपदरीकरणावेळी विनायक राऊत यांनी रेतीच्या गाड्या अडवल्या आणि स्वतः त्या बदल्यात कार घेतली. विकासकामात हे अडथळा आणतात. मी विकासकामे केली, तेव्हा ते कुठे होते? खासदार झाल्यावर हे गावात गेले, त्यांना गावातले लोक ओळखतात का? कधी अतिवृष्टी होते, कधी वादळ येतंय, त्यांनी आजपर्यंत काहीच केले नाही. खासदार म्हणून यांनी कोणते काम केले, हे सांगावे. मी अनेक शाळा उभारल्या आहेत. मी जेव्हा आमदार झालो, तेव्हा जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न 30 हजार कोटी रुपये होते. आज ते दीड लाख वाढले आहे. दरडोई उत्पन्नामध्ये जिल्हा चौथ्या क्रमांकावर आहे. नुसते तांदळाने इतके उत्पन्न वाढत नाही. चिपी विमानतळ हे आमचे श्रेय आहे. पाहुणे म्हणून या आणि पदाप्रमाणे निधी देऊन जा, असे राणे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.