राज्यात एकीकडे महापुराचा कहर सुरू असताना आपत्ती व्यवस्थापन विभागातील संचालक पद गेल्या सात महिन्यांपासून रिक्त होते. नव्या सरकारने त्याची दखल घेत आप्पासाहेब धुळाज यांची या पदावर नियुक्ती केली आहे.
धुळाज यांनी यापूर्वी राज्य कामगार विमा योजना आयुक्त, कोल्हापूर आणि लातूर येथे अपर जिल्हाधिकारी आणि नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात महसूल विभागाचे उपायुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
(हेही वाचा …तर ओबीसी आरक्षण रद्दच झाले नसते – देवेंद्र फडणवीस)
सांगली, पालघरसाठी पालक सचिवांची नियुक्ती
पालघर आणि सांगली जिल्ह्यासाठी पालक सचिवांची नियुक्ती करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्याच्या पालक सचिवपदी सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव सीमा व्यास आणि पालघर जिल्ह्याच्या पालक सचिवपदी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव डॉ. सोनिया सेठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community