गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला एका बार कडून ३ लाख रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते. वाझेने डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ च्या दरम्यान ४ कोटी ७० लाख रुपये जमा करून दिले. वाझेच्या म्हणण्यानुसार बॉस नंबर एक म्हणजे अनिल देशमुखच, असे ईडीने न्यायालयात देशमुख यांना ईडीची १४ दिवसांची कोठडी मिळावी, याकरता सांगितले. अखेर विशेष न्यायालयाने देशमुखांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावली.
रिमांड कॉपीमध्ये काय म्हटले ईडीने?
- अनिल देशमुख यांनी दिल्लीतल्या शेल कंपन्यांच्या माध्यमातून पैसे फिरवले. देशमुख यांनी कुटुंबातील सदस्य आणि इतर ओळखीतल्या लोकांच्या मदतीने पैशांची अफरातफर केली.
- दिल्लीतल्या शेल कंपनीच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या नागपुरातल्या साई शिक्षण संस्थेत पैसे डोनेशनच्या नावाखाली फिरवले. आतापर्यंत जो तपास करण्यात आला, जी कागदपत्रे आमच्या हाती लागली, त्यावरून अनिल देशमुख दोषी असल्याचे स्पष्ट होत आहे.
- आतापर्यंत २७ पेक्षा जास्त कंपन्या अशा आढळून आल्यात ज्या देशमुख कुटुंबियांकडून ऑपरेट केल्या जात होत्या. याच प्रकरणात देशमुखांना समन्स पाठवण्यात आले, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
- अनिल देशमुख चौकशीला हजर झाले मात्र ते तपासात सहकार्य करत नव्हते, ईडीच्या रिमांड अप्लिकेशनमधल्या माहितीनुसार या प्रकरणात १०० कोटींचे मनी लॉन्डरिंग झाले जे शोधून काढायचे आहे.
(हेही वाचा : अनिल देशमुखांची दिवाळी तुरुंगात; ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी)
Join Our WhatsApp Community