निवडणूक आयोगाला बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना यांच्याकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली आहेत. उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगासमोर ११ लाखाहून अधिक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली. मात्र त्यांचा फॉर्मेट चुकल्यामुळे त्यातील अडीच लाख प्रतिज्ञापत्र बाद ठरवण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या चर्चांवर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण देत पूर्णविराम दिला आहे.
निवडणूक आयोगाने काय दिले स्पष्टीकरण
ठाकरे गटाची शपथपत्र बाद करण्याचा अद्याप कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. सध्या ठाकरे गटाची शपथपत्र निवडणूक आयोगाला मिळालेली आहेत. या शपथपत्रांच्या तपासणीचे काम सुरू आहे. त्यामुळे अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
(हेही वाचा – आणखी 15 वर्षे सत्तेसाठी राष्ट्रवादीला तळमळत बसावं लागेल, शिंदे गटाच्या ‘या’ मंत्र्याचा इशारा)
ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे ११ लाख प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली होती. यातील अडीच लाख प्रतिज्ञापत्रे बाद करण्यात आली आहेत. अशा बातम्या गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत असल्याने त्यावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, या संबंधित बातम्या खोट्या असून त्यांच्या स्त्रोतावर विश्वास ठेवू नका. यावर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, निवडणूक आयोगाकडे अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र लागत नाहीत. एखाद्या पक्षाला मान्यता द्यायची किंवा चिन्ह द्यायचे यासाठी निवडणूक आयोगाने नियम ठरवलेले आहेत. गेल्या २० वर्षात वेगवेगळ्या आयुक्तांनी दिलेले निर्णय हे याचे प्रमाण आहेत. त्यामुळे कोणाचे प्रतिज्ञापत्र किती आहेत. कोणाचे प्रतिज्ञापत्र रद्द झाले आणि कोणाचे किती टिकले हे सर्व स्वतःच्या समाधानासाठी चालले आहे.
Join Our WhatsApp Community