NCP : राष्ट्रवादी काँग्रेसवर कुणाचा अधिकार?

138
NCP : राष्ट्रवादी काँग्रेसवर कुणाचा अधिकार?
NCP : राष्ट्रवादी काँग्रेसवर कुणाचा अधिकार?

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात रंगलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरील मालकीचा वाद आता लवकरच संपुष्टात येणार आहे. निवडणूक आयोगाने येत्या ६ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुद्यावर सुनावणी निश्चित केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकारावरून माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील भांडणाचा आता शेवट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खरे अध्यक्ष नेमके कोण आहेत? आणि कुणाचा शब्द अंतिम मानला गेला पाहिजे? या निर्णय पुढच्या शुक्रवारनंतर होऊ शकतो.

पाच राज्यांतील विधानसभांच्या निवडणुकीनंतर लोकसभेची निवडणूक होणे आहे. आयोगाने विधानसभांच्या निवडणुका अद्याप जाहीर केलेल्या नाही. मात्र, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या कामावर पूर्ण फोकस करता यावे म्हणून आयोगाने किरकोळ काम लवकरात लवकर संपविण्याचे ठरविले आहे. आयोगापुढे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अधिकाराची सुनावणी प्रलंबित आहे. ही सुनावणी घेऊन हा विषय संपविण्यासाठी आयोगाने पुढाकार घेतला आहे. येत्या शुक्रवार दि. ६ ऑक्टोबर रोजी आयोगाने शरद पवार आणि अजित पवार गटाला सुनावणीसाठी बोलाविले आहे. (NCP)

(हेही वाचा – Central Railways : महिला प्रवासांची ‘ही’ मागणी आता लवकरच पूर्ण होणार; मध्य रेल्वेने घेतला पुढाकार)

यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षावर नेमका कुणाचा हक्क आहे? आणि कुणाचा शब्द अंतिम मानल जाईल? या निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे. यानंतर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवर (Lok Sabha Elections) लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. सहा ऑक्टोबरच्या सुनावणीनंतर लवकरात लवकर निकाल दिला जाणार असल्याची चर्चा सुध्दा रंगली आहे. महत्वाचा मुद्या असा की, हे प्रकरण आयोगापुढे असताना अजित पवार यांनी राकाँच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना कार्याध्यक्ष बनविण्यात आले आहे. याशिवाय, सात महासचिव, पाच राष्ट्रीय सचिवांच्या नावाची घोषणा केली आहे. अजित पवार गटाने याची माहिती आयोगाला सुध्दा दिली आहे. (NCP)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.