यंदाचे वर्ष हे निवडणुकीचे वर्ष आहे. त्यामुळेच या गणेशोत्सवामध्ये राजकीय नेत्यांची बाप्पांच्या दर्शनासाठी जास्तीची रेलचेल पाहायला मिळत आहे. त्यातच दोन महिन्यावर आलेल्या विधानसभा निवडणुका (vidhana sabha election) लक्षात घेता नक्की हे बाप्पांचे दर्शन आहे की जनतेला दाखवण्यासाठी घातलेला हा घाट आहे. कधीही खुलेआम पणे देवदर्शन न करणारे पवार कुटुंबीय देखील यावेळेस कधी लालबागचा राजा तर कधी तेजू काया तर कधी मुंबईतील विविध गणेशोत्सव मंडळांना भेटीगाठी देणे असा प्रकार करताना पहावयास मिळत आहेत. (Pawar family)
(हेही वाचा- देश आत्मनिर्भर बनवण्यासाठी शेतकरी आणि मजूर यांच्या बळकटीकरणाची आवश्यकता – Nitin Gadkari)
गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच शरद पवार (Sharad Pawar) आपल्या नाती समवेत लालबागच्या राजाच्या दरबारात पहावयास मिळाले. त्या मागोमाग आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) हे देखील मुंबईभर गणेश दर्शनाचा लाभ घेत फिरत आहे. सकाळी सुरुवात लालबागच्या राजापासून केली गेली. त्यानंतर चिंतामणी, सिद्धिविनायक आणि नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यावरील गणेशाचे दर्शन अजित पवारांनी घेतले. (Pawar family)
यंदाच्या गणेशोत्सवावरती राजकारणाचा पगडा दिसून येत आहे. सत्ताधारी पक्ष तसेच विरोधी पक्षांकडून देखील विविध राजकीय बॅनर हे मंडळांना पुरवण्यात आल्याचे दिसून येते. मंडळ ज्या राजकीय पक्षाची संलग्न असेल त्या पक्षाचे बॅनर तर दिसून येतातच परंतु त्या ठिकाणी शासनाच्या वतीने सुरू असलेल्या योजनांचे बॅनर देखील मोठ्या प्रमाणात लागल्याचे दिसून येते. निवडणुकीचे वर्ष असल्यानेच यंदाच्या गणेशोत्सवात राजकीय पुढारी आणि नेत्यांची लगबग काहीशी जास्त प्रमाणातच दिसून येत आहे. त्यामध्ये अधिकची भर म्हणून की काय केंद्रीय नेते देखील महाराष्ट्रात किंबहुना मुंबई फेऱ्या मारताना देखील पहावयास मिळाले आहेत. (Pawar family)
(हेही वाचा- Ind vs Pak Hockey Match : आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारत, पाक खेळाडूंमध्ये मैदानातच जुंपली)
गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव मानला जातो आणि या उत्सवाचा फायदा राजकीय मंडळी उचलणार नाहीत असे तर होणे अशक्यच आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात होत असलेले गणेश दर्शन हे नक्की कोणाला पावणार हे येणाऱ्या निवडणुकीचे निकाल सांगतील. (Pawar family)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community