‘त्या’ वादग्रस्त आश्रम चर्चवर हातोडा; चित्रा वाघ यांच्या मागणीनंतर कारवाई

92

नवी मुंबईतील सीवूड येथे बेकायदा उभ्या असलेल्या गाॅंस्पेल आश्रम व त्यातील चर्चवर अतिक्रमण विभगाने कारवाई करत उद्धस्त केले आहे. यावर आठ दिवसांत कारवाई करा अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिला होता. येथील फादरवर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी कारवाई करण्यात आली होती.

सिवूड येथील बेथेल गाॅस्पेल चर्चद्वारे चालवण्यात आलेल्या बेकायदेशीर बालाश्रमामध्ये 4 अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चर्चचे सर्व अनधिकृत बांधकाम नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको यांनी संयुक्त विद्यामाने कारवाई करुन उद्ध्वस्त केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त होता.

( हेही वाचा: शिवाजी महाराजांच्या अपमानावर गप्प बसणारे राज्यपालांइतकेच दोषी; उदयनराजे आक्रमक )

अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटक

यावर्षी ऑगस्ट महिन्यात ठाणे जिल्हा बाल संरक्षण युनिटने एका एनजीओसोबत या चर्चवर छापा टाकला होता. चर्चच्या आवारात 45 अल्पवयीन मुले- मुली आढळून आली. सर्व अल्पवयीन मुलांना वायुवीजन नसलेल्या अंधा-या आणि छोट्या खोल्यांमध्ये ठेवण्यात आले होते. यासोबतच त्यांना शिळे अन्नही देण्यात आले. धर्मोपदेशकाने आपला विनयभंग केल्याचे तीन मुलींनी पोलिसांना सांगितले. या अल्पवयीन मुलांना ठाणे जिल्ह्यातील विविध बालगृहात पाठवण्यात आले. छाप्याच्या एका आठवड्यानंतर, चर्चच्या 55 वर्षीय धर्मोपदेशकाला एनआरआय कोस्टल पोलिसांनी अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटक केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.