-
प्रतिनिधी
निवडणुकीत मुस्लिम मतांसाठी सोयीचे राजकारण करणाऱ्यांचे खरे चेहरे वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने समोर आले आहेत, अशी खरमरीत टीका शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी शिवसेना उबाठावर केली. राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कृती आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिवसेना उबाठाच्या दुटप्पी भूमिकेवर जोरदार हल्ला चढवला. “बाळासाहेबांचे विचार सोडून राहुल गांधी यांच्या सांगण्यावर वागणाऱ्या शिवसेना उबाठाची दुटप्पी भूमिका स्पष्ट झाली आहे,” असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी पुढे सांगितले की, “सोयीचे राजकारण करणारे जेव्हा म्हणतात की वक्फ बोर्ड विधेयकाचा हिंदुत्वाशी संबंध नाही, तेव्हा त्यांच्या भूमिकेवर संशय निर्माण होतो. आता ते बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातात की राहुल गांधी सांगतील तसे वागतात, हे पाहावे लागेल.” त्यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, “आम्ही कधीही मतांसाठी सोयीचे राजकारण केले नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांशी आम्ही ठाम आहोत. सत्तेसाठी आम्ही कधीही विचारांशी तडजोड केली नाही.”
(हेही वाचा – हिंदू शेतकरी आणि हिंदू देवस्थानच्या जमिनी परत करणार; महसूल मंत्री Chandrashekhar Bawankule यांची घोषणा)
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) म्हणाले, “काही मुठभर लोकांच्या हातात वक्फ बोर्डाची मालमत्ता ठेवण्यापेक्षा ती गरिब मुस्लिमांसाठी शाळा, रुग्णालयांसारख्या सुविधांसाठी वापरली गेली पाहिजे. हे विधेयक मुस्लिम समाजाच्या हिताचे आहे आणि त्यामुळे समाजाचा सर्वांगीण विकास होईल. मुस्लिम समाजानेही या विधेयकाचे स्वागत करायला हवे.” त्यांनी पुढे ठणकावून सांगितले की, “या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श चालतात. पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्याच आदर्शाने देशाचे नेतृत्व करत आहेत. इथे औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांना थारा नाही.”
महायुती सरकारचे १०० दिवसांत ८५ टक्के कामांचे उद्दिष्ट
बैठकीनंतर उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी महायुती सरकारच्या कामगिरीचा आढावाही सादर केला. “महायुती सरकारने १०० दिवसांचा कृती आराखडा तयार केला आहे. आज २६ विभागांचा आढावा घेतला असता, अधिकाऱ्यांनी आणि मंत्र्यांनी ही संकल्पना गांभीर्याने घेतल्याचे दिसले. आतापर्यंत ६० टक्के कामे पूर्ण झाली असून, २५ टक्के कामे प्रगतीपथावर आहेत. १०० दिवसांत ८५ टक्के कामे पूर्ण होतील,” अशी माहिती त्यांनी दिली. “मागील अडीच वर्षांत महायुती सरकारने ज्या वेगाने काम केले, तसाच वेग आता कायम राहील. महाराष्ट्र आता थांबणार नाही, तो दुप्पट-चौपट वेगाने पुढे जाईल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community