भारताच्या इतिहासात महनीय व्यक्तींचे मृत्यू झाले, त्यांच्या मृत्यूमागील सत्य काँग्रेस राजवटीत लपवून ठेवण्यात आले. त्याचा खुलासा चित्रपटाच्या माध्यमातून होऊ लागला आहे. काँग्रेसने असेच एक सत्य दडवून ठेवले, ते म्हणजे मोहनदास करमचंद गांधी यांची हत्या. गांधींवर तीन गोळ्या झाडल्याचे म्हटले जाते, वास्तवात गांधींवर चौथी गोळी झाडण्यात आली होती, ज्याने गांधींचा मृत्यू झाला होता, विशेष म्हणजे ही चौथी गोळी नथुराम गोडसे यांच्या बंदुकीतून सुटलीच नव्हती, मग ती गोळी कुणी झाडली, आता याचा खुलासा करणारा चित्रपट लवकरच येणार आहे, त्यावर आतापासूनच टीकाटिपण्णी होणे सुरु झाले आहे.
काँग्रेसच्या राजवटीने लपवले सत्य?
नेताजी सुभाषचंद्र बोस, लाल बहादूर शास्त्री यांचा संशयास्पद मृत्यू झाला. या महनीय व्यक्तींच्या मृत्यूमागील सत्य अजून गुलदस्त्यात आहे. त्याचा खुलासा करणे त्यावेळीच्या तत्कालीन काँग्रेस राजवटीने जाणीवपूर्वक टाळले. लाल बहादुरशास्त्री यांच्या हत्येविषयीचा खुलासा करणारा चित्रपट ‘दी ताश्कंद फाईल’ आला. त्यानंतर १९९०मध्ये काश्मिरात हजारो कश्मिरी हिंदूंची निर्घृण हत्या झाली, हा नरसंहारही काँग्रेसने दाबून ठेवला, त्याचे सत्य ‘दी काश्मीर फाईल्स’ या नावाच्या चित्रपटाने समोर आले. आता गांधींच्या हत्येमागील सत्य ‘बुलेट’ या चित्रपटाच्या माध्यमातून समोर येणार आहे. निर्माता आणि दिग्दर्शन सचिन मोहिते यांनी केले आहे.
(हेही वाचा “बाबरी मशीद नहीं भुलेंगे”, PFI च्या कार्यकर्त्यांकडून जप्त केलेल्या साहित्यातून धक्कादायक माहिती उघड)
गांधी हत्येवरील चित्रपट ‘बुलेट’
बुलेट चित्रपटाचा टिझर लॉन्च झाला आहे. युट्युबवर त्यावर आतापासूनच प्रतिक्रियांचा खच पडत आहे. त्यापैकी बहुतांश नेटकरी यांनी, ‘यानिमित्ताने गांधींना न्याय मिळेल, हत्येमागील सत्य बाहेर येईल, नथुराम गोडसे यांना न्याय मिळेल’, अशा आशयाच्या प्रतिक्रिया अधिक आहेत.
सोशल मीडियावर टीकाटिप्पणी
अनिकेत अहुजा म्हणतात, ‘प्रत्येकाचे सत्य नक्की समोर येईल, कारण सत्य कधीच लपवता येत नाही. ‘आदित्य कुमार म्हणतात, सत्य थोडीच लपणार आहे. सचिन मोहिते यांचे काम चांगले आहे. तर अर्जुन सिंग म्हणतात, हा विषय काश्मीर फाईल्सपेक्षा अधिक धक्कादायक असेल. हा चित्रपट बाहेर आल्यावर गोडसे यांना शेवटी न्याय मिळेल. देवांशी अहुजा म्हणाले, सत्य खरोखर बाहेर येईल, न्याय नक्की मिळेल सत्यमेव जयते. तर अभिजित कुमार म्हणाले, बापू सत्यासाठी लढले आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमागील सत्य लपवण्यात आले. ही विडंबना आहे.