विकी कौशल (Vicky Kaushal) याची मुख्य भूमिका असलेला आणि छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ (Chhaava) चित्रपटाची सध्या देशभरात चर्चा सुरु आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रात हा चित्रपट ‘टॅक्स फ्री’ (Tax free) करण्याची मागणी विविध संघटना आणि पक्षांकडून सुरू होती. परंतु महाराष्ट्रात करमणूक करच नाही. पण, अशातच एका दुसऱ्या राज्यात हा चित्रपट टॅक्स मुक्त करण्यात आला आहे. (Chhaava)
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी अखेर विकी कौशलचा ‘छावा’ (Chhaava) चित्रपट करमुक्त केला आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात ही घोषणा केली. मराठा शासकाबद्दल जाणून घेण्यासाठी हा चित्रपट पाहणे आवश्यक आहे, असे सांगितले. यानंतर त्यांनी त्याच्या अधिकृत एक्स हँडलवरूनही पोस्ट केली. त्यांनी लिहिलं की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांचे पूत्र संभाजी महाराजांवर आधारित ‘छावा’ या हिंदी चित्रपटाच्या करमाफीची घोषणा करतो.” (Chhaava)
छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती के अवसर पर उनके पुत्र संभाजी महाराज पर आधारित हिन्दी फिल्म ‘छावा’ को टैक्स फ्री करने की घोषणा करता हूं… pic.twitter.com/b6dm1sDH7P
— Dr Mohan Yadav (@DrMohanYadav51) February 19, 2025
हेही वाचा-MHADA च्या रिक्त घरांची माहिती गोळा करण्याचे उपाध्यक्षांचे अधिकाऱ्यांना निर्देश
दरम्यान, सिनेमा महाराष्ट्रात करमुक्त करण्याविषयी देवेंद्र फडणवीस म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य, वीरता आणि विद्धवता प्रचंड होती. परंतु इतिहासाने त्यांच्यावर अन्याय केला. आता त्यांच्यावर अतिशय चांगला चित्रपट आला आहे. हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी होत आहे. परंतु महाराष्ट्रात करमणूक करच नाही. इतर राज्य जेव्हा एखादा चित्रपट करमुक्त (टॅक्स फ्री) करतात, तेव्हा ते करमणूक कर माफ करतात. परंतु महाराष्ट्राने २०१७ सालीच करमणूक कर नेहमीसाठी रद्द केला. त्यामुळे आपल्याकडे करमणूक कर नाही. आता या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आणि संभाजी महाराज यांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी आम्हाला अधिक काय करता येईल, त्यासाठी आम्ही प्रयत्न करु.” (Chhaava)
हेही वाचा-Maha kumbh 2025: योगी सरकारचा मोठा निर्णय ; ९० हजार कैद्यांना मिळणार महाकुंभमेळ्यात स्नानाची संधी
‘छावा’ चित्रपटाद्वारे विकी कौशल आणि रश्मिका मंदाना ही जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसली. तसेच, चित्रपटात अक्षय खन्नानं मुघल बादशाह औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारीला रिलीज झाला आहे.या चित्रपटासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यामुळे थिएटर्सनी २४ तास शो सुरू केलेत आणि सगळेच्या सगळे हाऊसफुल्ल सुरू आहेत. (Chhaava)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community