उत्तर प्रदेशातील संभल (Sambhal) येथील वादग्रस्त शाही जामा मशिदीसमोरील रिकाम्या जागेवर पोलीस चौकी उभारण्यासाठी शनिवारी, 28 डिसेंबरला वैदिक मंत्रोच्चार करत भूमिपूजन करण्यात आले. पूर्ण विधी आणि मंत्रोच्चार करून ही पूजा करण्यात आली. यावेळी संभल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. या पोलीस चौकीचे नाव सत्यव्रत पोलीस चौकी असे ठेवण्यात येणार आहे. सत्ययुगात संभलचे नाव ‘सत्यव्रत नगर’ होते, अशी माहिती आहे.
एसएसपी श्रीशचंद्र आणि कोतवाली प्रभारी अनुज तोमर यांनी या चौकीची पायाभरणी केली. या काळात भगवान शिवाचे गुणगानही करण्यात आले. याआधी शुक्रवारी, २७ डिसेंबरला सरकारने जागा निश्चित करून जमिनीचे मोजमाप केले होते. चौकीच्या उभारणीचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. संभलचे (Sambhal) अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीचंद्र यांनी सांगितले की, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून येथे पोलीस चौकी बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
(हेही वाचा Dr. Manmohan Singh अनंतात विलीन; शासकीय इतमामात झाले पार्थिवावर अंत्यसंस्कार)
न्यायालयाच्या आदेशानुसार २४ नोव्हेंबर रोजी येथे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या काळात कट्टरतावादी मुस्लिमांनी हल्ला केला होता. मुस्लिम समाजाचे लोक ज्याला शाही जामा मशीद म्हणतात, हिंदू समाजाचे लोक त्याला हरिहर मंदिर म्हणतात. मंदिर पाडून त्यावर मशीद बांधण्यात आल्याचे हिंदू समाजाचे म्हणणे आहे. हिंदू समाजाने याबाबत न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे.
Join Our WhatsApp Community