नवीन जिल्हे निर्मितीचा कुठलाही प्रस्ताव सरकारकडे नाही; BJP च्या ‘या’ मंत्र्याने केला खुलासा

67

सध्या नवीन जिल्हे (New 21 district) तयार करण्याचा कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारकडे आलेला नाही. पुढील जनगणनेनंतर निर्णय होऊ शकतो, परंतु अनेक ठिकाणी नवे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय केले जाऊ शकतात. त्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. अप्पर जिल्हाधिकारी आणि त्यांच्या कार्यालयाची आस्थापना 100 दिवसांच्या आत उभारण्याचे आमचे प्रयत्न आहेत, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule Press Conference) यांनी दिली. ते नागपूरात पत्रकारांशी बोलत होते. (BJP)

गेल्या काही दिवसांपासून राज्यात नवीन 21 जिल्हे (New 21 district) तयार होणार असल्याची बातमी सोशल मीडियावर जोराने व्हायरल होत आहे. तसेच 26 जानेवारी रोजी नवीन जिल्ह्यांबाबत राज्य सरकारकडून घोषणा करण्यात येणार आहे.

(हेही वाचा – “शरद पवारांजवळ बसण्याचे टाळले, कारण…” – DCM Ajit Pawar यांनी दिले स्पष्टीकरण)

माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, राज्यात कोणतेही नवीन जिल्हे होणार नाही. मात्र जिल्हाधिकाऱ्यांवरचा वाढता ताण कमी करण्यासाठी काही जिल्ह्यात अप्पर जिल्हाधिकारी आणि त्याचे आस्थापना असा प्रस्ताव महसूल विभागाकडे (Department of Revenue) आहे. राज्यात नवीन जिल्हे तयार करण्याचा कुठलाही प्रस्ताव सध्या राज्य सरकारकडे आलेला नाही, मात्र याबाबत पुढील जनगणनेनंतर निर्णय होऊ शकतो. पण अनेक ठिकाणी नवे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय केले जाऊ शकतात. त्यासंदर्भात सध्या चर्चा सुरु आहे. तसेच नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील काटोल, पुणे येथील मावळ आणि बारामती, संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये अप्पर जिल्हाधिकारी आणि त्यांची आस्थापना नेमण्याचा प्रस्ताव 100 दिवसांच्या आत पूर्ण करण्याचा विचार महसूल विभागाकडून करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.