मुंबई विधानसभा अध्यक्षांची निवड सरकारला करायची आहे की नाही, असा सवाल महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधान सभेत उपस्थित केला.
‘चांगल्या संस्कारांचा सन्मान करा’
महाविकास आघाडीचे सरकार हे चुकीच्या पद्धतीने सत्तेवर आले आहे. त्यामुळे ते चुकीच्या पद्धतीने मतदानाचा ते आग्रह ते करीत असल्याचा आरोप आमदार मुनगंटीवार यांनी केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी सभागृहात आमदार घोडेबाजार करतात असा उल्लेख केल्याचा त्यांनी निषेध व्यक्त केला. नाना पटोले दहा वर्षे भाजपमध्ये राहिले त्यांनी पक्षातील चांगल्या संस्कारांचा सन्मान करावा असा खोचक सल्लाही त्यांनी दिला.
(हेही वाचा – ‘या’ कारणासाठी मुख्यमंत्र्यांनी चहापानाला मारलेली दांडी )
महाविकास आघाडीजवळ धैर्य नाही
सत्ताधारी विरोधी पक्षातील आमदारांसोबत बसूनही विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबद्दल तोडगा काढू शकतात. परंतु ते तसे करण्यापासून मुद्दाम स्वत:ला रोखत आहेत असेही ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकारजवळ धैर्य नाही. आवाजी पद्धतीने मतदान घेण्याच्या मुद्द्यावर आक्षेप घेत गुप्त मतदान घेण्यात यावे असे ते म्हणाले. आवाजी पद्धतीने प्रभारी अध्यक्षांनी परवानगी देऊ नये, अशी आग्रही मागणीही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केला.
Join Our WhatsApp Community