महाराष्ट्रातील राजकीय पेचावर राऊतांचं मोठं ट्वीट, ‘मविआ’ सरकार होणार बरखास्त?

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यातील राजकीय नाट्यादरम्यान, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मोठं विधान केले आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्त होण्याच्या दिशेने सुरू आहे, असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार असल्याची चर्चा देखील सुरू झाल्याचे दिसतेय.

(हेही वाचा – राऊत म्हणाले, “जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल पण…”)

ठाकरेंच्या राजीनाम्याचे राऊतांकडून संकेत?

या ट्विटनंतर एकच खळबळ उडाली आहे, शिवसेनेकडे संख्याबळ कमी झालेले असून त्यांच्याकडे आवश्यक बहुमत नाही, शिवसेनेने मान्य केले आहे का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. त्यामुळे ठाकरे सरकार पडण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. सध्या राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्त होण्याच्या दिशेने असल्याचे ट्वीट राऊत यांनी केलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे राजीनामा देणार की भाजपचं सरकार पुन्हा येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात बड्या नेत्यांच्या भेटीगाठींना वेग आला आहे.

राऊतांच्या ट्वीटमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली असून ट्वीटमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र राऊतांच्या या ट्विटचा नेमका अर्थ काय?

1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार?
2. सरकारकडे बहुमत नसल्याचे शिवसेनेकडून मान्य?
3. मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस करणार?
4. अल्पमतातील सरकारची शिफारस राज्यपाल मान्य करणार?
5. दुसरं सरकार स्थापनेचा पर्याय समोर असताना राज्यपाल अशी शिफारस मान्य करतील?

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here