चिनीकडून पैसे घेऊन भारतविरोधी प्रचार करणाऱ्या NewsClickचा प्रमुख बनला माफीचा साक्षीदार

1010

NewsClick या न्यूज पोर्टलवर चीनकडून पैसा घेऊन भारत विरोधी प्रचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी या न्यूज पोर्टलचा संस्थापक प्रबीर पुरकायस्थ आणि हेड अमित चक्रवर्ती यांना अटक करण्यात आली. मनी लॉन्डरिंग प्रकरणी ही अटकेची कारवाई करण्यात आली. आता या प्रकरणी पोर्टलचे प्रमुख अमित चक्रवर्ती याने माफीचा साक्षीदार बनायची तयारी दाखवली आहे. त्यासाठी त्याने स्वतःच न्यायालयात अर्ज केला आहे.

चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या प्रोपोगांडा स्पेशलिस्टकडून 38 कोटी रुपये मिळवले

NewsClick क्लिकने चिनी कम्युनिस्ट पार्टीचा प्रोपोगांडा स्पेशलिस्ट नेव्हिल रॉय सिंघम याच्याकडून 38 कोटी रुपये मिळवले होते हे सर्व पैसे मनी लॉन्डरिंगमधूनच जमा झाल्याचे तपासात आढळले आणि त्यानंतरच अमित चक्रवर्तीने माफीचा साक्षीदार बनण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली न्यायालयाने यापूर्वी NewsClick  – चायनीज प्रोपगंडा प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यासाठी दिल्ली पोलिसांना 60 दिवसांची मुदतवाढ दिली होती. NewsClick चे HR प्रमुख अमित चक्रवर्ती यांनी सोमवारी दिल्ली न्यायालयात NewsClick चे काही कारणांनी सांगितले चिनी एजंट कडून पैसे घेऊन NewsClick वेब पोर्टलने भारत विरोधी प्रचार केला भारताच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण होईल, असा नॅरेटिव्ह तयार केला. याच प्रकरणात अमित चक्रवर्ती यांनी माफीचा साक्षीदार बनवण्याचा अर्ज पटियाला हाऊस कोर्टाला सादर केला. पटियाला हाऊस कोर्टाने अमित चक्रवर्ती आणि न्यूज पोर्टलचे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांच्याविरुद्धच्या खटल्याचा तपास पूर्ण करण्यासाठी दिल्ली पोलिसांना 60 दिवसांची न्यायालयीन कोठडी वाढवल्यानंतर ही महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे.

(हेही वाचा दिशा सालियन प्रकरणात SIT मधून चिमाजी आढाव पोलीस अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्याची नितेश राणेंची मागणी )

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.