सरकारी अधिका-यांमुळे संक्रमण शिबिरात घुसखोरी! मंत्री आव्हाडांची कबुली

130

संक्रमण शिबिरांची संख्या कमी आहे. अस्तित्वात असलेल्या संक्रमण शिबिरांमध्ये असलेले घुसखोर ही पुष्कळ मोठी डोकेदुखी आहे. ही घुसखोरी आताच झाली नसली, तरी या घुसखोरीला म्हाडाचेच अधिकारी कारणीभूत आहेत, याची आपल्याया लाज वाटते, अशा शब्दात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत कबुली दिली.

उच्चस्तरीय चौकशी करणार

शहरातील संक्रमण शिबिरांची संख्या पुष्कळ कमी असल्याने जुन्या आणि जीर्ण इमारतींच्या दुरुस्तीसाठी किंवा पुनर्विकासासाठी संक्रमण शिबिरे उपलब्ध होत नाहीत, अशी लक्षवेधी आमदार अमिन पटेल यांनी १५ मार्च या दिवशी विधानसभेत मांडली. संक्रमण शिबिरात कर संकलकांच्या आशीर्वादाशिवाय घुसखोरी होणे शक्य नाही. त्यामुळे या प्रकरणाची आपण गंभीर नोंद घेऊन उच्चस्तरीय चौकशी करणार आहे. मुंबईकरांच्या हितासाठी संक्रमण शिबिरांची चौकशी करण्यात येईल. जिथे करसंकलन दोषी आढळतील, तिथे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिले.

(हेही वाचा विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक रखडली! कारण…)

म्हाडाच्या निधीत वाढ करणार!

मुंबई येथे १६ हजारांपेक्षा अधिक उपकरप्राप्त जुन्या इमारती आहेत. त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी म्हाडाकडे केवळ १०० कोटी रुपयांचा निधी आहे. तो अपुरा पडतो. त्यामुळे त्यात वाढ करावी, अशी मागणीही पटेल यांनी केली. याला उत्तर देताना अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून हा निधी किमान २५० कोटी रुपये करता येईल का?, याविषयी मी शासनाकडे पाठपुरावा करतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.