मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून शिवसेना आणि ठाकरे गटात सतत वाद होतांना दिसतात. अशातच पुन्हा एकदा शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात वाद झाला. ठाण्यामधील ठाकरे गटातील महिला पदाधिकारी आयोध्या पौळ (Ayodhya Poul) यांना शाई फेक करत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे आता ठाकरे आणि शिंदे गटाचा वाद वाढण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटाच्या महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक आयोध्या पौळ (Ayodhya Poul) यांच्यावर कळव्यात शाई फेक करत मारहाण केल्याचा आरोप पौळ यांनी केला आहे. कळवा मनीषा नगर, जय भीम नगर भागात अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त कार्यक्रम ठेवण्यात आला होता. सर्व महापुरुष यांच्या फोटोला हार घालत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला शेवटी हार का घातला? म्हणून स्थानिक महिलांनी पौळ यांच्यावर शाइ फेकत मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (१६ जून) रात्री उशिरा घडली.
काही महिलांनी ही शाई फेक केली असून या प्रकरणाची नोंद करण्याची प्रक्रिया कळवा पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत सुरू होती. अयोध्या पौळ (Ayodhya Poul) यांनी ट्विटरच्या माध्यमातून विरोधकांवर टीका करत असतात. शुक्रवारी खासगी कार्यक्रम कळवा येथील जय भीम नगर परिसरात आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमासाठी आयोध्या पौळ आल्या होत्या. त्यावेळी काही महिलांनी त्यांना घेरले आणि त्यांच्या चेहऱ्यावर शाईफेक केली. या प्रकरणाची नोंद कळवा पोलिस ठाण्यात करण्यात येत असून पोलिस महिलांचा शोध घेत आहेत.
(हेही वाचा – Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली स्वातंत्र्य सैनिक भास्कर नायगांवकर यांची सदिच्छा भेट)
पौळ (Ayodhya Poul) यांना ठाकरे गटाचा कार्यक्रम म्हणून आमंत्रण देण्यात आले होते. मात्र, ठाकरे गटाचा कार्यक्रम नसून ट्रॅप रचण्यात आला असल्याचे स्थानिक ठाकरे गटातील महिला पदाधिकारी यांनी यावेळी सांगितले. तसेच सुषमा अंधारे आणि खासदार राजन विचारे, ठाकरे गट आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष केदार दिघे देखील या कार्यक्रमास येणार असल्याचे भासवून पौळ यांना आमंत्रित केले असल्याचे महिला पदाधिकारी यांनी सांगितले.
शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांच्यावर कळव्यात टोळक्याची भ्याड शाईफेक
– एका कार्यक्रमासाठी कळव्यात आलेल्या अयोध्या यांना काही जणांच्या टोळक्याने घेरले आणि शाई फेकली #shivsena #saamanaonline pic.twitter.com/fSx6BaNI6K
— Saamana (@SaamanaOnline) June 16, 2023
आयोध्या पौळ यांची प्रतिक्रिया
मी (Ayodhya Poul) अन माझा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो अन माझ्या देशाचे संविधान कोणावरही हात उचलायची परवानगी देत नाही म्हणून होत असलेला हल्ला अहिंसेचा मार्ग अवलंबत मी सहन करत होते, माझी लढाई ही संविधानिक आहे अन मी ती लढेल. आज माझा #शिवसेना पक्ष, माझे नेते-उपनेते, आमदार अन लाखो शिवसैनिक माझ्या सोबत होता. लढण्याची ताकद तुम्ही सर्वांनी दिली. एक एक करुन व्हिडिओ समोर येत आहेत ते सोशल मीडियावर शेअर करेनच आणि घडलेला प्रकार तुम्हा सर्वांच्या पुढे मांडेन. असं म्हणत अयोध्या पौळ पाटील यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community