एसटी कर्मचा-यांचा बेमुदत संप होणारच! पडळकरांची घोषणा

जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलगीकरण होत नाही, राज्य कर्मचाऱ्यांना मिळते, तेच एसटी कर्मचाऱ्यांना जोवर मिळत नाही, तोवर संप मागे घेणार नाही, अशा महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या भावना आहेत, असे पडळकर म्हणाले.

149
आज मध्य रात्रीपासून एसटी कर्मचारी यांचा संप सुरू असणार आहे आणि जोवर एसटीचे राज्य सरकारमध्ये विलणीकरण होणार नाही, तोवर संप मागे घेणार नाही, असे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.

काय म्हणाले आमदार पडळकर? 

मंत्री अनिल परब यांनी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा विश्वासघात करू नये, २७ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आता कर्मचारी उत्स्फूर्तपणे संपावर जात आहेत. त्यांची एकच मागणी आहे की, महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलणीकरण करावे, अशी मागणी आहे. या एकमेव मागणीसाठी हा संप आहे. परंतु राज्य सरकारने काही संघटनांना हाताशी धरून हा संप मोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या मागण्या  पूर्ण झाल्या आहेत, संप मागे घेण्यात आला आहे, अशा अफवा माध्यमांमध्ये पसरवण्यात आल्या. ही बातमी येताच महाराष्ट्रातील एसटीच्या विविध विभागांतून आपल्याला फोन आले. त्या सर्वांची एकच मागणी आहे, जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलगीकरण होत नाही, राज्य कर्मचाऱ्यांना मिळते, तेच एसटी कर्मचाऱ्यांना जोवर मिळत नाही, तोवर संप मागे  घेणार नाही. म्हणून महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या ज्या भावना आहेत. त्यासाठी भाजपा तुमच्या पाठिशी आहे. जोवर एसटीचे राज्य सरकारमध्ये विलगीकरण होत नाही तोवर आपला संप चालूच राहील. मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा चुकीचा प्रयत्न करू नये. संघटनांना हाताशी धरून जे उद्योग सुरु केले, ते बंद करावेत आणि या सर्व कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करावी. यातून मार्ग निघत असेल, कर्मचारी खुश असतील, तर आमचे काही म्हणणे नाही, असेही आमदार पडळकर म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.