राज्यात बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दा गंभीर; उपाययोजना करण्याचे गृहराज्यमंत्री Yogesh Kadam यांचे आश्वासन

61
राज्यात बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दा गंभीर; उपाययोजना करण्याचे गृहराज्यमंत्री Yogesh Kadam यांचे आश्वासन
  • प्रतिनिधी

राज्यात सुमारे ६५० पेक्षा जास्त बांगलादेशी घुसखोर सापडले असून, हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी दिली. त्यांनी सांगितले की, या संदर्भात अधिकृत आकडेवारी लवकरच जाहीर केली जाईल.

भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी घुसखोरांचा आकडा २ लाख १४ हजार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षांमध्येच यावर मतभेद असून, नेमकी संख्याच स्पष्ट नाही. राज्यभरात अजूनही मोठ्या प्रमाणात घुसखोरी सुरू असल्याचे मंत्री कदम (Yogesh Kadam) यांनी सांगितले.

(हेही वाचा – Drugs Seized : मुंबईत 22 कोटी रुपयांचे 2.2 किलो कोकेन जप्त)

घुसखोरीची पद्धत आणि सरकारची भूमिका

मंत्री कदम (Yogesh Kadam) यांनी सांगितले की, बांगलादेशी घुसखोर मोठ्या प्रमाणावर कलकत्तामार्गे भारतात प्रवेश करतात आणि नंतर संपूर्ण देशभर पसरतात. त्यांनी स्पष्ट केले की, फक्त बांगलादेशीच नव्हे तर नेपाळवरूनही अनेक स्थलांतरित भारतात आले आहेत.

त्यांचे दस्तऐवज पडताळणी सुरू असून, हे रोखण्यासाठी गृहखात्याशी चर्चा सुरू आहे. योग्य उपाययोजना केल्याशिवाय ही समस्या थांबणार नाही, असेही मंत्री कदम (Yogesh Kadam) यांनी स्पष्ट केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.