#The Kashmir Files : चित्रपटाचा प्रभाव पडला खासदारावर, थेट काँग्रेसचा केला त्याग

129

‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांच्या वेदना पुन्हा एकदा भारतीयांसमोर आल्या आहेत. यासोबतच समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात त्याचा परिणाम दिसून येत आहे. मात्र देशातील विरोधी पक्षनेते याबाबत विविध प्रश्न उपस्थित करत आहेत. त्याचा परिणाम जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या राजकारणावरही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे दिसून येत आहे. या चित्रपटाचा फटका जम्मू-काश्मीरमधील काँग्रेसला जोरदार बसला आहे. येथे दिवंगत महाराजा हरि सिंह यांचे नातू आणि करण सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह यांनी चित्रपट पाहिल्यावर काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.

काश्मिरी जनतेच्या भावना समजण्यास काँग्रेस अपयशी 

जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरील माझी मते राष्ट्रहिताचे प्रतिबिंब आहे, परंतु ती मते काँग्रेसच्या भूमिकेशी जुळत नाहीत. काँग्रेस सत्यापासून दूर जात आहे. काँग्रेस काश्मिरातील जनतेच्या भावना समजून घेण्यात अपयशी ठरली आहे, असे सांगत खासदार विक्रमादित्य सिंह यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले. हे पत्र सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. खासदार सिंह हे 2019 मध्ये उधमपूर पूर्वमधून निवडणूक हरले होते. त्यांचा केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी पराभव केला.

(हेही वाचा #The Kashmir Files : महाराष्ट्रातील सुपुत्राच्या हत्येने सुरू झाला काश्मिरातील नरसंहार!)

खासदार सिंह यांनी गुपकार आघाडीवरही केली होती टीका  

सिंह यांनी 2018 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. जम्मू-काश्मीरच्या अनेक मुद्द्यांवर मी राष्ट्रहिताच्या दृष्टीने समर्थन केले आहे, तेव्हापासून माझी भूमिका काँग्रेसपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. पाकिस्तानातील बालाकोटमधील सर्जिकल स्ट्राईक, जम्मू-काश्मीरमधील ग्राम संरक्षण समित्यांचा पुनर्विकास, कलम ३७० रद्द करणे आणि लडाखला केंद्रशासित प्रदेश बनवणे या मुद्द्यांवर सिंग यांची भूमिका काँग्रेसपेक्षा वेगळी होती. यासोबतच त्यांनी गुपकार आघाडीवरही टीका केली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.