The Kerala Story : ‘लव्ह जिहाद’ हा तर हिंदु आणि ख्रिस्ती महिलांच्या गर्भावरील आतंकवादी हल्ला – चित्रपट निर्माता प्रशांत संबरगी

काश्मीरमधील आतंकवादात पाकिस्तान सहभागी असल्याचे हिंसक घटनांनी लक्षात येते, तर केरळमधील आतंकवाद हा ‘लव्ह जिहाद’ हा ‘सॉफ्ट टेरेरिझम’चा भाग असून ‘सौदी’ आणि ‘सीरिया’सारखे देश यामागे आहेत.

276
‘लव्ह जिहाद’ हा तर हिंदु आणि ख्रिस्ती महिलांच्या गर्भावरील आतंकवादी हल्ला
‘लव्ह जिहाद’ हा तर हिंदु आणि ख्रिस्ती महिलांच्या गर्भावरील आतंकवादी हल्ला

‘लोकसंख्या वाढ’, ‘लँड जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’ ही इस्लाम राष्ट्रनिर्मितीसाठीची ध्येयधोरणे आहेत. डावी आणि पश्चिमी प्रसारमाध्यमे याला काल्पनिक कथा म्हणतात; मात्र ‘द केरला स्टोरी’ The Kerala Story हे एक कटूसत्य असून ‘लव्ह जिहाद’ हा हिंदू-ख्रिस्ती महिलांच्या गर्भावरील आतंकवादी हल्ला आहे, असे परखड मत कर्नाटकातील प्रसिद्ध चित्रपट निर्माते तथा वितरक प्रशांत संबरगी यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘द केरला स्टोरी : लव्ह जिहादपासून आयसिसपर्यंत !’ या विषयावरील ऑनलाइन ‘विशेष संवादा’त ते बोलत होते.

या वेळी प्रशांत संबरगी पुढे म्हणाले की, वर्ष 2019 या वर्षी ‘हलाला’ प्रथेवर आधारित ‘हलाला अ कर्स’ (Halala A Curse) नामक चित्रपटालाही काँग्रेसने विरोध केला; मात्र चित्रपट निर्मात्याने ‘हलाला प्रथे’चे भीषण सत्य न्यायालयासमोर सिद्ध केल्यामुळे काँग्रेसचा विरोध फोल ठरला. वर्ष 2010 मध्ये केरळ उच्च न्यायालयातही ‘लव्ह जिहाद’चे सत्य समोर आले. हे रोखण्यासाठी सरकारने आंतरधर्मीय विवाहावर निर्बंध आणणे आवश्यक आहे. याच आधारावर ‘द केरला स्टोरी’ The Kerala Story हा चित्रपट बनवण्यात आला आहे. काश्मीरमधील आतंकवादात पाकिस्तान सहभागी असल्याचे हिंसक घटनांनी लक्षात येते, तर केरळमधील आतंकवाद हा ‘लव्ह जिहाद’ हा ‘सॉफ्ट टेरेरिझम’चा भाग असून ‘सौदी’ आणि ‘सीरिया’सारखे देश यामागे आहेत.

(हेही वाचा The Kerala Story : ‘काश्मीर फाईल्स’नंतर आता ‘द केरला स्टोरी’वर डाव्यांचा नवा ‘डाव’!)

यावेळी ‘रणरागिणी’ शाखेच्या प्रतिक्षा कोरगांवकर म्हणाल्या की, एकीकडे काँग्रेस आणि डावे पक्ष ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी करत आहे, तर दुसरीकडे याच काँग्रेस पक्षाचे सरकार महाराष्ट्रात असतांना वर्ष 2011 मध्ये एक परिपत्रक काढून ‘लव्ह जिहाद’विषयी माहिती गोळा करण्यास सांगितले होते, तसेच ‘लव्ह जिहाद’चे 22 गुन्हे नोंदवल्याची माहिती ‘माहितीच्या अधिकारा’अंतर्गत दिली होती. तसेच तत्कालीन केरळचे कम्युनिष्ट पक्षाचे मुख्यमंत्री व्ही.एस. अच्युतानंदन यांनी वर्ष 2010 मध्ये थेट दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन ‘येत्या 20 वर्षांत केरळला ‘इस्लामिक स्टेट’ बनवण्यासाठी षड्यंत्र रचले जात आहे’ अशी माहिती दिली होती. इंग्लंडच्या गृहमंत्र्यांनी नुकतेच पाकिस्तानी वंशाची मुले ‘इस्लामिक ग्रूमिंग गँग’द्वारे इंग्लंडमधील ख्रिस्ती मुलींना लक्ष्य करत असल्याचे म्हटले आहे. ‘स्वीडन’ने ‘द केरला स्टोरी’प्रमाणे त्यांच्या देशातील महिलांवर ‘आयसीस’च्या (इस्लामिक स्टेटच्या) आतंकवाद्यांनी केलेल्या भीषण अत्याचारावर चित्रपट मालिका बनवली होती आणि तिच्या जनजागृतीसाठी प्रोत्साहन दिले होते, असेही प्रतिक्षा यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.