देशात लाल बहादूर शास्त्री यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर दि ताश्कंद फाईल चित्रपट आला, त्यानंतर कश्मीरमध्ये हिंदूंचा वंश विच्छेद करण्यात आला, त्यावर आधारित ‘दी काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता, आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर येणार आहे. हा विषय आहे आंतराष्ट्रीय दहशतवादी संघटना आयसिसच्या महिला तस्करी आणि त्यांच्या धर्मांतराचा विषय आहे.
https://twitter.com/adah_sharma/status/1588118687135207424?s=20&t=jXPn6nxGLOQA_lsI9PRHGA
१ मिनिटाच्या टीझरने चर्चेला उधाण
बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता विपुल अमृतलाल शाह यांच्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे. ‘मला नर्स व्हायचे होते पण आता मी आयसिसची दहशतवादी आहे’, या वाक्याने या टीझरची सुरुवात केली आहे. या वाक्यावरूनच केरळमधील ३२,००० महिलांच्या तस्करी-धर्मांतराची हृदयद्रावक क्रूरता दाखवली जाईल. युट्युबवर शेअर केलेला टीझर १ मिनिट १९ सेकंदाचा आहे.
व्हायचे होते नर्स झाली दहशतवादी
या टीझरमध्ये एका महिलेची कथा दाखवण्यात आली आहे जिने नर्स बनण्याचे स्वप्न पाहिले होते, परंतु तिचे घरातून अपहरण केले जाते आणि आता आयसिस दहशतवादी म्हणून अफगाणिस्तानात तुरुंगात टाकले जाते. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा मुख्य भूमिकेत आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. टीझरमध्ये अदा शर्मा बुरखा घातलेली दिसत आहे. ती म्हणते, “माझे नाव शालिनी उन्नीकृष्णन होते. मला नर्स बनून लोकांना मदत करायची होती. आता मी फातिमा बी आहे. एक इसीस दहशतवादी, जी अफगाणिस्तानमधील तुरुंगात बंद आहे. मी एकटी नाही. माझ्यासारख्या आणखी ३२,००० मुलींचे धर्मांतर करून त्यांना सीरिया आणि येमेनमध्ये पुरण्यात आले आहे.