गेल्या 8 वर्षांत ईशान्य भारतातील प्रदेशांच्या प्रगतीवर तसेच कार्यक्रमाबाबत व्यापक माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिजिटल माध्यमांवर प्रस्तुत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमो अप्लिकेशन आणि माय गोव्ह संकेतस्थळावरील ईशान्येकडच्या राज्यांच्या सर्वांगीण विकासाकरता गेल्या 8 वर्षांत केलेल्या परिवर्तनशील उपक्रमांची माहिती देणारे लेख प्रसिद्ध केले.
The last 8 years have seen unprecedented development in the Northeast. The focus is on infrastructure creation, ensuring better healthcare, education and popularising the rich cultures from the different states of the region. #8YearsOfPurvottarKalyan https://t.co/XLl6Vmfcm3
— Narendra Modi (@narendramodi) June 13, 2022
काय म्हणाले मोदी?
ट्वीटर द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “गेल्या 8 वर्षांत ईशान्येकडेच्या राज्यांनी अभूतपूर्व प्रगती पहिली आहे. पायाभूत सुविधांची निर्मिती, आरोग्य सेवा सुनिश्चित करणे, शिक्षण आणि या प्रदेशातील विविध राज्यांची समृद्ध संस्कृती लोकप्रिय करणे यावर विशेष भर राहिला आहे. ईशान्येकडच्या राज्यांच्या सर्वांगीण विकासाकरता परिवर्तनशील उपक्रम.” असे मोदींनी त्यांच्या ट्विटर संदेशात म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी narendramodi.in आणि mygovवर शासनाच्या गेल्या 8 वर्षांच्या कार्यकाळात केलेले विविध उपक्रम आणि सुधारणा यांची माहिती देणारे लेख प्रसिद्ध करीत आहे.
योग जागतिक पातळीवर लोकप्रिय
आगामी जागतिक योग दिनासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना विशेष आवाहन केले. विविध भारतीय भाषांमध्ये ट्वीटर द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, योगविद्येने जागतिक पातळीवर प्रचंड लोकप्रियता मिळविली आहे. राजकीय नेते, संस्थांचे प्रमुख, क्रीडापटू आणि अभिनयाच्या क्षेत्रातील व्यक्तींसह जीवनाच्या विविध क्षेत्रांतील लोक नियमितपणे योगाचा सराव करतात. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी योगावर आधारित चित्रफीत देखील प्रदर्शित केली.
Join Our WhatsApp Community