आरक्षण संपवण्याची काँग्रेसची सुप्त इच्छा उघड झाली; Chandrashekhar Bawankule यांचा हल्लाबोल

180
आरक्षण संपवण्याची काँग्रेसची सुप्त इच्छा उघड झाली; Chandrashekhar Bawankule यांचा हल्लाबोल
आरक्षण संपवण्याची काँग्रेसची सुप्त इच्छा उघड झाली; Chandrashekhar Bawankule यांचा हल्लाबोल
काँग्रसचे नेते व लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अमेरिकेत केलेल्या आरक्षण विरोधी वक्तव्याच्या तीव्र निषेध करत, आरक्षण संपवणे ही काँग्रेसची सुप्त इच्छाच असून फक्तं ती आता राहुल गांधी यांच्या ओठातून व्यक्त झाली, अशा संतप्त शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी शुक्रवारी येथे राहुल गांधी यांच्यावर टीकेचा थेट निशाणा साधला.
भाजपाच्या वतीने आज राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आरक्षण विरोधी केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ राज्यभर जोरदार आंदोलन करण्यात आले.मुंबईत चर्चगेट स्थानकाच्या बाहेर त्याचवेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), राष्ट्रीय सचिव आ.पंकजा मुंडे (Pankaja Munde), मुंबई भाजप अध्यक्ष आ.आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते या आंदोलनात सहभागी झाले होते.त्यावेळी उपस्थित असलेल्या प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनीशी बोलताना बावनकुळे यांनी लोकसभा निवडणुकीआधी जातीय जनगणना,आदिवासी, दलित जनतेबद्दल कळवळा दाखवणा-या काँग्रेसची सामाजिक न्यायासंदर्भातली भूमिका किती दुटप्पी आहे हे राहुल गांधी यांच्या अमेरिकेतील वक्तव्यातून स्पष्ट झाल्याचा थेट आरोपच केला.
काँग्रेसने कायम लोकशाही, व संविधानाची पायमल्लीच केली असून आता काँग्रेसची मजल आरक्षण रद्द करण्याची इच्छा व्यक्त करण्यापर्यंत गेल्याचा घणाघात करत, याविरोधात भाजप आता थेट जनतेमध्येच जाऊन  प्रबोधन करेल, असेही बावनकुळे यांनी नमूद केले.आज राहुल गांधींच्या संविधान विरोधी आणि आरक्षण विरोधी वक्तव्याच्या विरोधात राज्यभर भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले.राज्यभरात ठिकठिकाणी राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत, नेहरू ते गांधी काँग्रेसी नेते आरक्षण विरोधी … बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान सहन करणार नाही… अशा आशयाचे फलक घेऊन, हाताला काळ्या फिती बांधून भाजपा नेते,पदाधिकारी, कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. ठिकठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरही राहुल गांधी यांचा निषेध करण्यात आला. (Chandrashekhar Bawankule)
अकोला येथे भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.रणधीर सावरकर व अन्य भाजप नेत्यांनी काळ्या फिती बांधून आंदोलनात भाग घेतला.तरं मुंबईत मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, आ.मिहीर कोटेचा यांनी घाटकोपर येथे आंदोलनातून काँग्रेसविरोधात एल्गार पुकारला.जो पर्यंत राहुल गांधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी येथील स्मारकावर जाऊन नाक रगडून माफी मागत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच राज्यभर सुरू राहील असा खणखणीत इशाराही आ.शेलार यांनी दिला.मात्र राहुल गांधींच्या वक्तव्याबाबत उद्धव ठाकरे,शरद पवार का बोलत नाहीत? असा सवालही आ. शेलार यांनी केला.आजपर्यंतचा काँग्रेसचा इतिहास बघता त्यांनी कायमच लोकशाही आणि संविधानाचा अपमानच केला अशा तिखट शब्दांत पंकजा मुंडे यांनी काँग्रेसचा समाचार घेतला.  (Chandrashekhar Bawankule)
या आंदोलनात ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन,खा.स्मिता वाघ,आ. सुरेश भोळे,संजय सावकारे यांनी जळगावात, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुण्यात,वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथे,गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे, माजी खा.व राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ.हिना गावीत,भाजपा प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी नंदुरबार येथे सहभाग घेतला.सोलापूर येथे आ. सुभाष देशमुख,सांगली येथे आ.सुधीर गाडगीळ, तरं नाशिकमध्ये आ.देवयानी फरांदे आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला. (Chandrashekhar Bawankule)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.