Janata Darbar : सत्ताधारी पक्षाची नवीन स्ट्रॅटर्जी तयार, मंत्र्यांचे जनता दरबार सुरू

सर्वसामान्य जनतेचे गाऱ्हाणे ऐकून घेण्यासाठी स्वतः मंत्री हे मंत्रालयाबाहेर असलेल्या बंगल्यांमध्ये कार्यालय थाटून जनतेचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी जनता दरबार लावत आहेत.

134
Janata Darbar : सत्ताधारी पक्षाची नवीन स्ट्रॅटर्जी तयार, मंत्र्यांचे जनता दरबार सुरू
Janata Darbar : सत्ताधारी पक्षाची नवीन स्ट्रॅटर्जी तयार, मंत्र्यांचे जनता दरबार सुरू

मंत्रालय प्रवेशासाठी सर्वसामान्य जनतेला मोठ्याप्रमाणात अडचणी येतात. त्यामुळे आपल्या अडचणी मंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. आता या अडचणी दूर करण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेचे गाऱ्हाणे ऐकून घेण्यासाठी स्वतः मंत्री हे मंत्रालयाबाहेर असलेल्या बंगल्यांमध्ये कार्यालय थाटून जनतेचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी जनता दरबार लावत आहेत. (Janata Darbar)

शिवसेना पक्षाने बाळासाहेब भवन नावाने एक बंगला ताब्यात घेतला आहे त्या ठिकाणी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आपला जनता दरबार भरवला होता. याचप्रमाणे राष्ट्रवादीने देखील मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या दिवशी आपल्या मंत्र्यांना मंत्रालयासमोर पक्ष कार्यालयात जनतेचे गाऱ्हाणे ऐकून घेण्यासाठी जनता दरबार भरवण्याची स्ट्रॅटर्जी तयार केली आहे. यामुळे पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची अडलेली कामे हातोहात करून देण्यासाठी मदत होणार आहे. त्याचबरोबर या जनता दरबाराचा फायदा हा सर्व सामान्य जनतेशी जोडून घेण्यासाठी देखील पक्षाला होणार असल्याचे बोलले जात आहे. (Janata Darbar)

(हेही वाचा – Ambedkar Statue in USA : देशाबाहेरचा बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात उंच पुतळा अमेरिकेत विराजमान)

मात्र या उलट भाजपचे मंत्री अशा पद्धतीने जनता दरबार घेताना दिसत नसल्याने त्यांचा जनतेशी असलेला संवाद कुठेतरी तुटत असल्याचे दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यालय देखील मंत्रालया पासून हाकेच्या अंतरावर आहे. यापूर्वी भाजपकडून अशा प्रकारची संकल्पना मोठ्या प्रमाणात राबवली जात होती. परंतु मागील काही दिवसांपासून यात खंड पडल्याचे दिसून येत आहे. (Janata Darbar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.