सामना आमच्याशी आहे, लक्षात ठेवा; पाकिस्तानी सिनेमावरून MNS चा इशारा

80
सामना आमच्याशी आहे, लक्षात ठेवा; पाकिस्तानी सिनेमावरून MNS चा इशारा
  • प्रतिनिधी

पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित होण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसे नेते अभिजित पानसे यांनी संबंधितांना थेट इशारा देत म्हटले आहे की, “सामना आमच्याशी आहे, हे लक्षात ठेवा.” पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.

अभिजित पानसे यांनी आपल्या एक्स हँडलवर पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही, हे इतक्या वेळा सांगूनही काही नासके आंबे उपटतातच. मग त्यांना कचऱ्यात टाकायचे काम मनसैनिकांनाच करावे लागणार आणि आम्ही ते करणार, करत राहणार. ‘अबीर गुलाल’ हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणजे नाही.” त्यांनी पुढे संबंधितांना उद्देशून म्हटले की, “ज्यांना पाकिस्तानी कलाकारांना डोक्यावर घ्यायचे आहे, त्यांनी खुशाल घ्यावे, पण लक्षात ठेवा सामना आमच्याशी आहे.” (MNS)

(हेही वाचा – Bombay High Court वर काळ्या जादूची छाया? कोर्टाबाहेर सापडली लिंबू, मिरची आणि काळी बाहुली)

पाकिस्तानी चित्रपटांच्या प्रदर्शनाला मनसेचा यापूर्वीही कडाडून विरोध राहिला आहे. याआधी ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला मनसेने (MNS) आक्षेप घेतल्याने त्याचे भारतातील प्रदर्शन रद्द झाले होते. आता ‘अबीर गुलाल’ या चित्रपटाच्या संभाव्य प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर मनसेने पुन्हा आपली भूमिका कठोरपणे मांडली आहे. अभिजित पानसे यांच्या या इशाऱ्यामुळे चित्रपट वितरक आणि निर्मात्यांमध्ये खळबळ उडण्याची शक्यता आहे.

मनसेच्या (MNS) या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट भारतात प्रदर्शित करण्याच्या प्रयत्नांना मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. “आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही,” असे संकेत पानसे यांच्या वक्तव्यातून मिळत आहेत. येत्या काळात या मुद्द्यावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.