माजी आमदार Vijay Shivtare आणि DCM Ajit Pawar यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण

66
माजी आमदार Vijay Shivtare आणि DCM Ajit Pawar यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण
  • प्रतिनिधी

शिवसेना नेते आणि माजी मंत्री, आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देवगिरी निवासस्थानी भेट घेतली. जवळपास वीस मिनिटांपेक्षा अधिक काळ या दोघांमध्ये चर्चा झाल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

दर मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या पक्षाच्या आमदार व मंत्र्यांसोबत बैठक घेतात. या बैठकीत ते आमदारांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्या या बैठकीतील सहभागामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

(हेही वाचा – राज्य सरकारने Atal Setu संदर्भात घेतला ‘हा’ मोठा निर्णय)

विजय शिवतारे (Vijay Shivtare) हे शिवसेनेचे महत्त्वाचे नेते मानले जातात. त्यामुळे त्यांच्या या भेटीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या भेटीत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील नाराजी, राजकीय समीकरणे किंवा शिवतारे यांचा स्वतंत्र निर्णय यावर चर्चा झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

राजकीय निरीक्षकांच्या मते, या भेटीमुळे शिवसेने आणि भाजपा-राष्ट्रवादी आघाडीतील संबंधांवरही परिणाम होऊ शकतो. दरम्यान, शिवतारे (Vijay Shivtare) किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भेटीवर भाष्य केलेले नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.