जिल्हा परिषद सदस्यांची किमान संख्या आता ५० वर

जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५० आणि जास्तीत जास्त ७५ करण्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियम १९६१ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

( हेही वाचा : महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियमात राज्य सरकारने केली सुधारणा)

सध्या राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये कमीत कमी ५५ आणि जास्तीत जास्त ८५ अशी सदस्य संख्या आहे. ग्रामीण भागातील घटत चाललेल्या लोकसंख्येमुळे सुधारित सदस्य संख्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या जिल्ह्याला किमान ५० जागा देण्यात येतील, अशी माहिती देण्यात आली.

मोटार वाहन विभागासाठी सुधारित आकृतीबंध

  • राज्याच्या मोटार वाहन विभागासाठी सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे राज्य शासनाच्या तिजोरीवरील खर्चाचा भारही कमी होणार आहे.
  • मोटार वाहन विभागासाठी ४३५० पदांच्या सुधारित आकृतीबंधानुसार नवीन ४४३ नियमित पदे निर्मिती करण्यात येतील. यामध्ये सह परिवहन आयुक्त या संवर्गातील ५ नियमित पदांचा देखील समावेश आहे.

नवीन महाविद्यालयांसाठी इरादापत्रांची मुदत १७ ऑगस्टपर्यंत

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या अधिनियमामुळे महाविद्यालयांना नवीन उपकेंद्र, परिसंस्था सुरू करणे, तसेच नवीन अभ्यासक्रम, विषय, विद्याशाखा अतिरिक्त तुकड्या किंवा सॅटेलाईट केंद्रे सुरू करण्यासाठी १७ ऑगस्ट २०२२ पूर्वी इरादापत्र दाखल करता येईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here