संसदेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून सुरू होणार

157

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने गुरुवारी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार, संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलै रोजी होणार आहे. १८ जुलै रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार असून हे अधिवेशन साधारण महिनाभर म्हणजेच १२ ऑगस्टपर्यंत चालू राहणार आहे.

(हेही वाचा – शिवसेनेला बाजूला ठेऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, उद्धव ठाकरेंचा निशाणा)

लोकसभा सचिवालयाने गुरूवारी याबाबत एक प्रसिद्धी पत्रक जारी केले. त्याद्वारे अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. गेल्या वर्षी विरोधी पेगासस हेरगिरी, शेतकऱ्यांचा विरोध आणि तेलांच्या किंमतीत झालेली वाढ यावर चर्चा करण्यासाठी सरकारकडे परवानगी मागितली होती. जी प्रत्यक्षात आली नाही, तर दोन्ही सभागृहात जोरदार राडा झाला होता, त्यामुळे मागच्या वर्षाचे पावसाळी अधिवेशन गदारोळात संपले होते. यंदाच्या अधिवेशानत महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ यासारखे कित्येक प्रश्न मांडले जाण्याची शक्यता वर्तविली जाऊ शकते. तसेच देशभरातून विरोध होणाऱ्या अग्निपथ योजनेवरूनही विरोधी पक्ष केंद्र सरकारला घेरण्याची शक्यता आहे.

तसेच, लोकसभा सचिवालयाने जाहीर केलेल्या पत्रकानुसार, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान घेण्यात येणार आहे. २१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. तर २५ जुलै रोजी देशाचे नवनिर्वाचित राष्ट्रपती म्हणून राष्ट्रपतींचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. राष्ट्रपती निवडणुकीनंतर ६ ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडणार आहे. तर ११ ऑगस्टला उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेऊन कारभार हाती घेणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.