पत्राचाळ प्रकरणावरुन शरद पवारांच्या पोटात का बरं दुखतंय?

135

पत्राचाळ प्रकरणात शरद पवार यांचा खास माणूस म्हणून ख्याती असलेले संजय राऊत जेलची हवा खात आहेत. संजय राऊत आत बसून ईडीला कोणकोणती माहिती देत आहेत हे जरी गुलदस्त्यात असलं तरी संजय राऊतांनी आपल्या मालकाचं नाव घेतलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ईडीच्या आरोपपत्रानुसार २००६-२००७ या काळात एका तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री आणि एक माजी मुख्यमंत्री यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीनंतर गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून राकेश वाधवान यांना पत्राचाळीचा विकास करण्यासाठी आणण्यात आले होते. तसेच यामध्ये १ हजार ३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे ईडीने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे.

( हेही वाचा : राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक न लढण्याची नाटकं का करत आहेत? )

याआधीच शरद पवार यांनी विधान केलं होतं की कारण नसताना संजय राऊत यांना अटक केली आहे. शरद पवार इतक्या दिवसांनंतर बोलले याचा काहीतरी अर्थ होतो. त्यांच्या विधानानंतर त्यांचं नाव या घोटाळ्यात आलं. याआधी स्टॅम्प घोटाळ्यात शरद पवारांचं थेट नाव आलं होतं. पण दुर्दैवाने तेलगीचा मृत्यू झाला आणि ते प्रकरण शरद पवारांपर्यंत पोहोचू शकलं नाही.

अतुल भातखळकर यांनी तर आक्रमक पवित्रा घेतला आहे. बड्या सत्ताधारी राजकारण्यांचा वरदहस्त असल्याशिवाय हा भ्रष्टाचार अशक्य होता. ईडीच्या आरोपपत्रात जे नाव आहे ते one and only one शरद पवार. याप्रकरणी तत्काळ चौकशी व्हावी” असं ट्वीट अतुल भातखळकर यांनी केलं आहे. त्यामुळे इडी आपली मोहिम शरद पवारांकडे वळवू शकते असं सांगण्यात येतंय. याचाच अर्थ या नावाला संजय राऊत यांनी दुजोरा दिला असणार.

शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव असणारं व्यक्तिमत्व आहे. नवाब मलिक, देशमुख आणि संजय राऊत अशा सर्व भ्रष्टाचारी नेत्यांना शरद पवार पाठिंबा का देतात हाच मूळ प्रश्न आहे. त्यांना त्यांचे चाहते जाणता राजा म्हणतात. ही उपाधी समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी वापरली होती. शरद पवारांच गट रामदासांचा द्वेष करतो तरी त्यांना समर्थांच्याच शब्दांचा आधार घ्यावा लागला. पण जाणता राजा असा असतो का? तो दाऊद सारख्या भारताच्या शत्रूच्या मित्राला पाठिंबा देतो का? भ्रष्टाचारी लोकांना पाठिशी घालतो का? जर शरद पवार जाणता राजा असतील तर त्यांनी सर्वप्रथम या सर्व गोष्टींना विरोध करायला हवा. पण जेव्हा ते या सर्व गोष्टींचं समर्थन करतात, तेव्हा राजकीय वर्तुळात जी चर्चा रंगत असते तोच संशय आपल्या मनात निर्माण होतो की, या सर्व प्रकरणांत शरद पवार यांचा सहभाग तर नसेल ना? किंबहुना तेच सर्वांचे गुरु तर नसतील ना? म्हणूनच पत्राचाळ प्रकरणात शरद पवारांच्या पोटात दुखू लागलं नाही ना?

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.