राज्यमंत्र्याचे नाव food and civil supplies खात्याने बदलले!

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री योगेश कदम यांचे सरकारी यंत्रणेने केले बारसे.

74
राज्यमंत्र्याचे नाव food and civil supplies खात्याने बदलले!
राज्यमंत्र्याचे नाव food and civil supplies खात्याने बदलले!
  • खास प्रतिनिधी

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले आणि भाजपाच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाले. डिसेंबर महिन्यात नागपूर येथे विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मंत्रिमंडळ विस्तार केला आणि ४३ पैकी ४२ पदे भरली. त्यात ३५ मंत्री असून सहा राज्यमंत्री आहेत. शपथविधी पूर्ण होताच संबंधित मंत्र्यांची नावे ही पदानामासह शासकीय वेबसाइटवर अपलोड करण्यात आली.

फोटो, नाव, पदनाम

महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर ‘अन्न व नागरी पुरवठा विभागा’च्या (food and civil supplies) मुखपृष्ठावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच खात्याचे मंत्री धनंजय मुंडे आणि राज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांचे फोटो आणि नाव, पदानाम याचा उल्लेख करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Mahakumbh मध्ये उद्योगपती गौतम अदानींनी स्वतः केले महाप्रसादाचे वितरण)

राज्यमंत्र्याचे नाव चुकीचे

इंग्रजी भाषेतील नाव, पदानाम योग्य असून मराठी भाषेतील नावात फरक असल्याचे निदर्शनास आले आहे. मराठी भाषेतील पेजवर राज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्याऐवजी राजेश कदम असे नाव टाकण्यात आले आहे. मंत्रिमंडळ विस्तार होऊन महिना उलटला तरी अद्याप राज्यमंत्र्याचे नाव चुकीचे छापण्यात आल्याचे संबंधित खात्याच्या लक्षात आले नाही आणि लक्षात आले असेल तर चूक दुरुस्त करण्यात आली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

कदम यांच्याकडे महत्वाची खाती

योगेश कदम (Yogesh Kadam) हे केवळ अन्न व नागरी पुरवठा खात्याचचेच नाही तर गृह (शहर) राज्यमंत्री असून महसूल, ग्रामविकास आणि पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन अशा महत्वाच्या खात्यांचा कार्यभारही त्यांच्याकडे आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.