Manik Kokate यांना तूर्तास दिलासा?

155

Manik Kokate : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते (NCP) आणि राज्याचे कृषि मंत्री (state Agriculture) माणिक कोकाटे यांच्या दोन वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने (Nashik District Sessions Court) स्थगिती दिल्याने कोकाटे यांची आमदारकी आणि मंत्री पद सध्या तरी वाचले आहे. (Manik Kokate)

दोन वर्षांची शिक्षा
माणिक कोकाटे आणि त्यांच्या बंधूना कोर्टाने (Court) दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यामुळे त्यांची आमदारकी (MLA) आणि मंत्री पद जाणार का? अशी चर्चा सुरू झाली असतानाच नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्याने तूर्तास तरी कोकाटे यांना दिलासा मिळाला आहे. कोकाटे यांचा जामीन यापूर्वीच मंजूर केला असून, अपिलाचा निकाल येईपर्यंत ही शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे.

२९ वर्षांनी या खटल्याचा निकाल
कोकाटे यांना नाशिक न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. १९९५ मध्ये कागदपत्रांची फेरफार आणि फसवणुकीच्या आरोपांवरून हा निर्णय देण्यात आला होता. तब्बल २९ वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला आहे.

(हेही पाहा – उत्तराखंड सरकार शालेय अभ्यासक्रमात Veer Savarkar यांच्यावरील धडा समाविष्ट करणार; शिक्षण मंत्री धनसिंग रावत यांची घोषणा)

मंत्री पद सुरक्षित
आमदार किंवा खासदार यांना न्यायालयाने दोषी मानून दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ शिक्षा सुनावल्यास १९५१ च्या लोकप्रतिनिधी कायद्यातील कलम ८ (३) तरतुदीनुसार संबंधित आमदार-खासदाराचे पद रद्द होते. आता कोकाटे यांना स्थगिती मिळाल्याने त्यांचे मंत्री पद सध्या तरी सुरक्षित राहिले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.