एक विषाणू आणि तीन सरकारी यंत्रणांचा गोंधळ!

164

लंडनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या एक्स-ई विषाणूचा प्रसार मुंबईत झाल्याची बातमी बुधवारी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आणि एकच गोंधळ उडाला. या विषाणूचा फैलाव झाल्याचे आताच कुठे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले होते. जगभरातील फैलावाचे ठिकाण आणि विषाणूच्या व्याप्तीबाबत काहीच माहिती नसताना मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याने राज्याचे वनविभाग आणि केंद्रीय आरोग्य यंत्रणेला बुधवारी चांगलेच कामाला लावले.

अन् एकच गोंधळ उडाला

पालिकेच्या ११व्या जनुकीय अहवालात कोरोनाच्या पहिल्या लाटेत आढळून आलेल्या कापा आणि लंडनमध्ये तीन महिन्यांपासून धुमाकूळ घालणा-या एक्सई या विषाणूचे प्रत्येकी एक रुग्ण आढळल्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली. दक्षिण आफ्रिकेतील रहिवासी असलेल्या महिलेला मुंबई भेटीत कोरोनाची लागण झाली होती. तिला कोणतेही लक्षण नसताना कोरोनाची बाधा झाल्यानंतर तिला ताज लॅण्ड हॉटेलमधये विलगीकरणात ठेवण्यात आले होते. या महिलेच्या जनुकीय नमुन्यांची माहिती बुधवारी इतर रुग्णांच्या नमुन्यांच्या माहितीसह उपलब्ध झाली आणि एकच गोंधळ उडाला.

राज्यभरातील यंत्रणांना भीती

राज्याच्या आरोग्य विभागाने ही केस संभाव्य एक्सई विषाणूची असल्याचे जाहीर केले. त्यानंतर मंत्र्यांपासून सर्वच सरकारी यंत्रणा एक्सई विषाणू आढळल्यास काय करावे लागेल, याची पूर्वकल्पना घेण्यासाठी तयारीला लागल्या. राज्यभरातील कोविड उपाचाराचे केंद्र आता बंद होत असताना, वेळेआधी चौथी लाट एक्सई विषाणूमुळे येते की काय, या भीतीमध्ये रात्रभर वरिष्ठ पातळीवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुरु राहिली. ही महिला आता मुंबईत आहे का, याबाबत खुद्द पालिका अधिका-यांनाही रात्री उशिरापर्यंत माहिती नव्हती.

( हेही वाचा: कोरोनाच्या नव्या विषाणूंबाबत आरोग्यमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण )

केंद्रीय आरोग्याने दावा फेटाळला

राज्य आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी केंद्राशी संबंधित जनुकीय अहवाल देणा-या संस्थांची माहिती ही प्रमाणबद्ध असल्याचे स्पष्ट केले. मात्र देशात सध्या एक्सई विषाणूचा रुग्ण नाही, असे केंद्रीय आरोग्य विभागाने रात्री उशिरा प्रसिद्धीपत्रक जारी करत सांगितले. तसेच संबंधित रुग्णाच्या जनुकीय चाचण्यांचा अहवाल पाठवण्याचा आदेशही केंद्राने पालिकेला दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.