Maratha Reservationच्या पार्श्वभूमीवर राज्यात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने पुन्हा हा प्रश्न चर्चेत आला आहे. मनोज जरांगे पाटलांनी सरकारला २ जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. परंतु मराठा समाजाकडून आरक्षणाच्या पुढील लढाईचे नियोजन सुरू झाले आहे. मुंबईत रविवार, ५ नोव्हेंबर रोजी मराठा क्रांती मोर्चाची बैठक पार पडली. त्यात ३ ठराव समंत करण्यात आले आहेत.
जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित केले, त्यांनी २४ डिसेंबरपर्यंत सरकारला वेळ दिला आहे. सरकारने मराठा समाजाला ठोस काहीतरी द्यावे, नाहीतर पुढील नियोजनासाठी मुंबई सज्ज आहे. आजच्या बैठकीत ३ ठराव झाले. जरांगे पाटील यांची दिवाळीनंतर भेट घेऊ. मुंबईकर म्हणून आम्ही सज्ज आहोत हा पहिला ठराव, दीड महिन्याच्या कालावधीत मराठा जोडो अभियान सुरू करत सकल मराठा समाज नोंदणी करू हा दुसरा ठराव आणि तिसऱ्यात ठरावात बिहारमध्ये सरकारने जातीनिहाय जणगणना सुरू केली. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना झाली पाहिजे अशी मागणी मराठा समाजाने केली. तसेच जातनिहाय जनगणनेबाबत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री, आमदारांना निवेदन देण्यात येतील, मराठा जोडो अभियानासाठी वेबसाईट, टोल फ्री नंबरही देणार आहोत, असे या बैठकीचे निमंत्रक म्हणाले.
Join Our WhatsApp Community