मुंबई महापालिकेची मुदत येत्या ७ मार्च रोजी संपुष्टात येत असून त्यामुळे स्थायी समितीची शेवटची सभा २ मार्च रोजी होणार आहे. या शेवटच्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर करण्यासाठी विविध खात्यांनी व विभागांनी विकास कामांचे प्रस्ताव सादर केले. तब्बल दोनशेच्या लगबग प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहे. महापालिकेच्या आजवरच्या इतिहासामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रस्ताव सादर केले जात असून एकाच दिवशी दोनशे पेक्षा अधिक प्रस्ताव मंजूर केले जाण्याची शक्यता वर्तवली आहे.
१७९ प्रस्ताव पाठवण्यात आले
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक २ मार्च रोजी होणार आहे. या बैठकीसाठी शुक्रवारी प्रस्ताव पाठवण्यात आले. यामध्ये एकूण १७९ प्रस्ताव पाठवण्यात आले असून शेवटची बैठक असल्याने प्रत्येक खात्याकडून तसेच विभागाकडून महापालिका चिटणीस विभागाला प्रस्ताव घेण्यासाठी धावपळ सुरु होती. प्रत्येक विभागांनी आपले प्रस्ताव समितीच्या सभेपुढे मांडण्यासाठी सादर केले आहे.
(हेही वाचा मुंबईच्या रस्त्यांच्या खोदकामावर ३८३ कोटींची मलमपट्टी: काळ्या यादीतील दोन कंपन्यांही ठरल्या पात्र)
सुमारे दोन हजार कोटींच्या घरांमध्ये हे प्रस्ताव असू शकतील
महापालिका बरखास्त होणार असल्याने पुढे प्रशासक नियुक्त होणार असल्याने त्यापूर्वी हे प्रस्ताव मंजूर करून घेण्याची घाई सत्ताधारी पक्षाची असून प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही त्यानुसार हे प्रस्ताव सादर केले आहेत. त्यामुळे सुमारे दोन हजार कोटींच्या घरांमध्ये हे प्रस्ताव असू शकतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. शनिवारी सकाळी स्थायी समिती सदस्यांना हे प्रस्ताव पाठवण्यात आले. आतापर्यंत १७९ प्रस्ताव समितीच्या पटलावर ठेवण्यात आले असले तरी अजून २५ हून अधिक जोड प्रस्ताव तथा अतिरिक्त प्रस्ताव पाठवले जाण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे हे प्रस्ताव २००च्या पुढे जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
Join Our WhatsApp Community