‘आम्ही निवडणूक जाहीरनाम्यात केलेल्या घोषणेनुसार राज्यातील सर्व टोल नाक्यांवर फोर व्हीलर किंवा छोट्या गाड्यांना टोलमुक्त केले होते. केवळ व्यावसायिक वाहनांवरच आपण टोल आकारतो’, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केला होता. त्यावरून उलटसुलट चर्चा रंगल्यानंतर उपमुख्यमंत्री कार्यालयाने यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. (Devendra Fadnavis)
फडणवीस यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यातील टोलमाफीसंदर्भात एक विधान केले होते. त्याबाबत माध्यमांमधून नेमक्या निर्णयासंदर्भात विचारणा होते आहे. त्याबाबतची माहिती अशी: ३१ मे २०१५ रोजी मध्यरात्री १२ पासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडील ३८ पथकर स्थानकांपैकी ११ पथकर स्थानकांवरील व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ५३ पैकी १ पथकर स्थानकावरील अशा एकूण १२ पथकर नाक्यांवरील पथकर वसुली बंद करण्यात आली. (Devendra Fadnavis)
(हेही वाचा – Shubman Gill : पुढच्या सामन्याला खेळणार की नाही? शुबमन गिलबाबत ‘ही’ माहिती आली समोर)
सार्वजनिक बांधकाम विभागाकडील उर्वरित २७ पथकर स्थानके तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या २६ पथकर स्थानकावरील अशा एकूण ५३ पथकर स्थानकांवरील कार, जीप व एसटी महामंडळाच्या बसेस अशा वाहनांना ३१ मे २०१५ रोजी मध्यरात्री १२ वाजेपासून पथकरातून सूट देण्यात आली आहे. यासंदर्भात नुकसान भरपाई देण्याचा निर्णय सुद्धा २०१७ मध्ये घेण्यात आला होता आणि त्याचा जीआर सुद्धा ३१ ऑगस्ट २०१७ रोजी जारी करण्यात आला, अशी माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली. (Devendra Fadnavis)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community