एकीकडे आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई पालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात मोर्चा सुरू असताना मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी आपली भूमिका मांडताना कनाल म्हणाले, ‘मला पक्षाने भरपूर दिले. पण, मीही पक्षाला खुप दिले. मीही पक्षाची सेवा केली. कोरोनाकाळातील मेव्याबाबत माझा काही संबंध नाही’, असा टोलाही त्यांनी लगावला.
(हेही वाचा – हा पप्पू तुम्हाला चॅलेंज देतोय, या अंगावर; आदित्य ठाकरेंचे शिंदे आणि भाजपाला आव्हान)
ठाकरे गटावर टीका करताना राहुल कनाल म्हणाले, कोरोनाकाळात राहुल कनाल चांगला होता. पण, आता तो वाईट का झाला? ज्यांनी पक्षासाठी काही केले नाही, त्यांना पक्षात स्थान दिले जात आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि मी कोरोकाळात रस्त्यावर होतो. मी त्यांच्यापासून अनेक गोष्टी शिकल्या आहेत. आपण आमचे नेते आहात, असे कौतुगोद्गारही कनाल यांनी काढले.
लोक म्हणतात, सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणामुळे मी इकडे आलो असेन. मात्र, तुम्ही चौकशी करा आणि माझा थोडाजरी संबंध या प्रकरणाशी आढळला, तर माझे डोके आणि तुमचा बुट असले, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community