महाराष्ट्राची जनता मविआला विधानसभा निवडणुकीत जोड्याने मारणार; CM Eknath Shinde यांचा हल्लाबोल

79

कर्नाटकात काँग्रेस सरकारने बुलडोझर लावून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबी लावून तोडण्यात आला. आता तेच काँग्रेसवाले आंदोलन करत आहेत. या काँग्रेसवाल्यांनाच खरंतर जोड्याने किंवा चपलेने मारलं पाहिजे. ते सोडून आता मुंबईत आंदोलन करत आहेत. मात्र महाराष्ट्राची जनता समजदार आहे. त्यांना पराभव दिसू लागला आहे. येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीला जनता जोड्याने मारणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी राजकीय मुद्दा नसून ते आमच्या अस्मितेचा विषय आहेत. मात्र विरोधकांकडून या घटनेचे राजकारण केले जात आहे. हे अतिशय दुर्दैवी आहे. महाविकास आघाडीचे हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला ही अतिशय वाईट आणि दुःखद घटना आहे. आमच्यासाठी ही अत्यंत संवेदनशील बाब आहे. तमाम महाराष्ट्रातील शिवभक्त या घटनेने भावनिक झाले आहेत, असेही मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले.

(हेही वाचा तुमच्या मनातील सावरकर द्वेष पुढे आला; भाजपाचा Uddhav Thackeray यांच्यावर पलटवार)

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या विरोधात हे लोक कोर्टात गेले. आधी मुंबई उच्च न्यायालयात गेले, आता नागपूर खंडपीठात गेले. गरीब भगिनींना आम्ही पैसे देत आहोत तर यांच्या पोटात का दुखतं? असा सवालही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तसेच यावरुन यांची मानसिकता समजत असल्याचेही शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.