राज्य मराठी विकास संस्थेची मुंबईतील जागा कायम

138

मराठी भाषा विकासासाठी काम करणाऱ्या राज्य मराठी विकास संस्थेला मुंबईतील एल्फिन्स्टन तंत्रज्ञान संस्थेच्या आवारात पहिल्या मजल्यावर असलेली जागा रिकामी करण्याबाबतचे पत्र कौशल्य विकास विभागाने पाठवले आहे. त्यामुळे राज्याच्या राजधानीतच आपल्या मराठी भाषेला बेघर होण्याची वेळ आल्याचा मुद्दा विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून उपस्थित केला होता. त्यावर राज्य मराठी विकास संस्थेची मुंबईतील जागा कायम राहणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.

( हेही वाचा : गणेशोत्सवात रात्री विशेष ‘बेस्ट’ बससेवा; प्रवाशांसाठी २५ गाड्यांचे नियोजन)

मराठी भाषा विकास संस्थेच्या कार्यालयाची जागा यापुढेही त्यांच्याकडे कायम राहील हे सुनिश्चित करण्याची मागणी पवार यांनी केली होती. ‘ही जागा मराठी भाषा विभागालाकडेच राहील, तसेच या संस्थेच्या विकासासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल. पत्र कौशल्य विकास विभागाने संबंधित पत्र परस्पर कसे दिले, याची चौकशी करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

गुजराती, सिंधी भाषांसाठी निधी

  • मराठी विकास संस्थेला मुंबईतील एल्फिन्स्टन्स तंत्रज्ञान संस्थेच्या आवारात पहिल्या मजल्यावर असलेली जागा खाली करण्याचे पत्र कौशल्य विकास विभागाने पाठवले. त्यामुळे मराठी भाषा विकासासाठी काम करणाऱ्या विकास संस्थेवर, महाराष्ट्राच्या राजधानीत बेघर व्हायची वेळ आली आहे.
  • सरकारकडून पुरवणी मागण्यांमध्ये गुजराती, सिंधी भाषांसाठी निधीची तरतूद केली गेली, आम्ही सगळ्यांनी त्याचं स्वागत केले. त्यावेळी महाराष्ट्रात मराठी भाषेचाही विकास झाला पाहिजे, अशी अपेक्षा आम्ही व्यक्त केली होती. त्यानुसार मराठी भाषा संस्थेची जागा कायम ठेवण्याचे आदेश करण्याची मागणी पवार यांनी केली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.