राज्यात आरक्षणाचं राजकारण तापलं, ठाकरे सरकारने थेट मोदींना गाठलं

या भेटीत मराठा आरक्षण, ओबीसी तसेच राज्यातील इतर विषयांवर चर्चा करण्यात आली.

102

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजलेला असताना, येत्या काळात राज्यात मराठा समाज रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. राज्यसभा खासदार संभाजी राजे यांनी तर 16 जूनपासून थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आणि राज्यातील इतर विषयांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत मराठा आरक्षण, ओबीसी तसेच राज्यातील इतर विषयांवर चर्चा करण्यात आली.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

राज्याच्या प्रलंबित विषयांसाठी पंतप्रधानांची भेट घेतली. या दरम्यान व्यवस्थित चर्चा झाली. पंतप्रधानांनी सर्वच विषय गांभीर्याने ऐकले. केंद्राकडे प्रलंबित आहेत अशा प्रश्नांवर ते सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे. मी पंतप्रधानांना धन्यवाद देतो. त्यांच्या बोलण्यात कुठेही राजकीय अभिनिवेश नव्हता. मी आणि माझे सहकारी समाधानी आहोत. या प्रश्नांवर पंतप्रधान माहिती घेऊन पुढील कार्यवाही निश्चितपणे करतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

(हेही वाचाः आता बंद दाराआड मोदी-मुख्यमंत्र्यांची चर्चा, नेमकं काय घडलं?)

या विषयांवर झाली चर्चा

  • एसईबीसी मराठा आरक्षण
  • इतर मागासवर्गीयांचे पंचायत राज संस्थेच्या निवडणुकीतील राजकीय आरक्षण
  • मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षण
  • मेट्रो कार शेडसाठी कांजुरमार्ग येथील जागेची उपलब्धता:न्यायालयाबाहेर सर्वमान्य तोडगा काढणे
  • राज्यांना देय असलेली जीएसटी भरपाई
  • पिक विमा योजना: बीड मॉडेल
  • बल्क ड्रग पार्क: स्पर्धात्मक निविदेस मंजुरी
  • नैसर्गिक आपत्तीमधील मदतीसाठी एनडीआरएफचे कॉस्ट नॉर्म(निकष) बदलणे
  • १४ व्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळण्याबाबत (शहरी स्थानिक)
  • १४ व्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळण्याबाबत (पंचायत राज संस्था)
  • मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणे
  • राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची निवड करण्याबाबत
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.