आनंदाच्या गोष्टीतही विरोधकांचे राजकारण; Pravin Darekar यांनी सुनावले खडेबोल

61
आनंदाच्या गोष्टीतही विरोधकांचे राजकारण; Pravin Darekar यांनी सुनावले खडेबोल

टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने चांगली खेळी करत तब्बल १३ वर्षांनी आयसीसी विश्वचषक स्पर्धा जिंकली. या पार्श्वभूमीवर आज मुंबईकर खेळाडूंचा शुक्रवारी विधिमंडळात सत्कार करण्यात आला. पण या सत्काराचे निमंत्रण नसल्याचे सांगत भाई जगताप आणि अनिल परब यांनी सभागृहात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यावर भाजपा गटनेते प्रविण दरेकर यांनी विरोधक आनंदाच्या गोष्टीतही राजकारण करत असून खोटे बोल पण रेटून बोल अशी त्यांची भूमिका असल्याचे खडेबोल सुनावले. (Pravin Darekar)

(हेही वाचा – NEET PG 2024 परीक्षेची नवी तारीख जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा, जाणून घ्या…)

दरेकर म्हणाले की, भाई जगताप आणि अनिल परब यांचा मुद्दा रास्त आहे. त्याच्याशी आम्हीही सहमत आहोत. अधिकृत निमंत्रण सभापती किंवा विधिमंडळ म्हणून दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना देणे अपेक्षित आहे यात दुमत असायचे कारण नाही. आपला देश जगज्जेता झाला. लाखोंचा जनसागर उसळला होता. परंतु तुम्हाला ती गुजरातची बसच दिसली, एवढ्या कोत्या मनोवृतीचे आहात हे बरोबर नाही. निमंत्रणावर मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांचा फोटो लावणार नाही तर मग काय शंभर फोटो लावायचे का? असा सवाल करत विरोधक अशा वेळेला पण आनंद साजरा न करता राजकारण करतात. खोटे बोल पण रेटून बोल असे धोरण विरोधकांचे आहे, असे खडेबोल दरेकरांनी सभागृहात विरोधकांना सुनावले. (Pravin Darekar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.