आमच्या सर्वांसाठी मुख्यमंत्री पद किंवा उपमुख्यमंत्री पद ही पदे तांत्रिक व्यवस्था आहे, आम्ही याआधी तिघेही एकत्रित राहून निर्णय घ्यायचो आणि उद्याही एकत्रितपाने निर्णय घेऊ. मी स्वतः एकनाथ शिंदे यांना भेटून त्यांना मंत्रिमंडळात रहावे अशी विनंती केली होती. त्याला एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे आम्ही एकत्रितपणे चांगले सरकार महाराष्ट्राला देऊ जी आश्वासने आम्ही दिली ती सर्व पूर्ण करू, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.
संध्याकाळी किती जण मंत्रिपदाची शपथ घेणार त्याची माहिती देणार
राज्यपालांना भेटून तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) , एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली, तेव्हा फडणवीस बोलत होते. राज्यात नवीन मंत्रिमंडळ स्थापण्याचा दावा आम्ही केला आहे, राज्यपालांनी तो स्वीकारला असून ५ डिसेंबर रोजी शपथविधीची वेळ नेमून दिली आहे. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य, स्वाभिमान पक्ष आणि अपक्ष अशी मोठी महायुती झाली आहे. या सगळ्यांच्या सहीचे पत्र राज्यपालांना दिले आहे. शिवसेनेच्या वतीने माझ्या समर्थनार्थ पत्र दिले आणि महायुतीच्या वतीने माझा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी करावा असे पत्र दिले आहे. अजित पवार यांनीही राष्ट्रवादीच्या वतीने याच आशयाचे पत्र दिले आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. संध्याकाळी किती जणांचा शपथविधी होईल याविषयी माहिती देणार, असेही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.
Join Our WhatsApp Community