ख्रिस्ती धर्माचा प्रसार करून धर्मांतर करणाऱ्या पाद्रीने स्वीकारला Hindu Dharm

180

छत्तीसगड हे हिंदूंचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्याची मोठे ठिकाण. या ठिकाणी ख्रिस्ती मिशनरी येथील आदिवासीयांना प्रलोभने दाखवून त्यांचे धर्मांतर करत असतात, असे धर्मांतर मागील १८ वर्षांपासून करणारा पाद्री याला उपरोक्ती आली, त्याने आता हिंदू धर्मात घरवापसी केली आहे. छत्तीसगडमधील बलरामपूर येथे सतानंद महाराजांच्या ‘वनवासी राम कथा’मध्ये या पाद्रीने हिंदू धर्म (Hindu Dharm) स्वीकारला आहे.

गोमांस खाऊ घालून केलेले धर्मांतर 

पत्रसपोटा असे या पाद्रीचे नाव आहे. हा पाद्री ख्रिश्चन धर्माचा प्रचार करत होता. मात्र आता आपल्या चुकांचे प्रायश्चित करून स्वेच्छेने हिंदू धर्म (Hindu Dharm) स्वीकारला आहे. आपण हिंदूंना गोमांस खाऊ घालून त्यांचा धर्म भ्रष्ट केल्याची कबुली या पाद्रीने दिली. या ‘वनवासी राम कथे’मध्ये आतापर्यंत ८० कुटुंबातील २०० लोक हिंदू धर्मात परतले आहेत. हिंदू धर्मात परतलेल्या पाद्रीने सांगितले की, त्याने वेगवेगळ्या भागात जाऊन ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्याचे काम केले होते, मात्र वर्षभरापूर्वी त्याने हिंदुत्वाचे काम सुरु केले. श्रीमद भागवत कथेच्या वेळी सतानंद महाराजांचे प्रवचन ऐकल्यानंतर त्याच्या मनात हिंदू धर्म स्वीकारण्याचा विचार प्रबळ झाला.

(हेही वाचा Lok Sabha Election 2024: निकालापूर्वीच काँग्रेसकडून अतिउत्साहीपणा; १ क्विंटल लाडूची दिली ऑर्डर)

घरवापसी करणाऱ्या आणखी एका व्यक्तीने सांगितले की, संपूर्ण छत्तीसगड आणि संपूर्ण भारतभर ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या हिंदूंना घरवापसी (Hindu Dharm) करण्यास सतानंद महाराज यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. ते म्हणाले की, सतानंद महाराजांची प्रवचने त्यांना आतून सुसज्ज करतात. यावेळी सतानंद महाराज म्हणाले की, लोकांना गोमांस खाऊ घालून धर्मांतर करणे हे मोठे षडयंत्र आहे. हे सर्व गौमातेच्या पंचगव्याने शुद्ध झाले. यावेळी एका व्यक्तीने तुळशीची अंगठी घातली आणि मांस व दारू सोडली. जेव्हा आपण एखाद्याला फसवण्याऐवजी प्रेमाने स्वीकारतो तेव्हा विधर्मी आपल्या बांधवांना तोडण्याचा कट रचतात, असे ते म्हणाले. पैसे देऊन फसवले जाते, तुमच्या आत भूत आहे, असे सांगून त्यांना बरे करण्याचे आमिष दाखवून त्यांना ख्रिश्चन धर्माचे आमिष दाखविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.