स्वपक्षातील नेत्यांनीच वाढविल्या Mahua Moitra यांच्या अडचणी

127
स्वपक्षातील नेत्यांनीच वाढविल्या Mahua Moitra यांच्या अडचणी
  • प्रतिनिधी 

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) सतत चर्चेत असतात. हिरानंदानी प्रकरण असो वा आणखी कोणतेही त्यांच्याविषयी वादग्रस्त चर्चा सुरु असतेच. यावेळी त्या स्वतःच्या पक्षातील नेत्यांमुळे अडचणीत सापडल्या आहेत. पक्षातील सहा खासदारांनी मोईत्रा यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सहा खासदारांनी महुआ मोइत्रा यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. महुआ मोईत्रा (Mahua Moitra) या नादिया जिल्ह्यातील कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत.

(हेही वाचा –Fact Check : ज्ञानवापी प्रकरणातील याचिकाकर्त्याच्या निधनाचे व्हायरल छायाचित्र; काय आहे सत्यता? )

नादिया जिल्ह्यातील कृष्णनगर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या पाच विधानसभा जागांचे तृणमूल आमदार आणि महुआ (Mahua Moitra) यांच्या माजी विधानसभा मतदारसंघ करीमपूरचे तृणमूल आमदारांनी संयुक्तपणे मुख्यमंत्री आणि पक्षाच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांच्याकडे लेखी तक्रार केली असून त्यात अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. महुआ सध्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत.

(हेही वाचा – UP College मधील बेकायदेशीर मशिदीविरोधात विद्यार्थी आक्रमक; म्हणाले, आम्ही हनुमान चालिसा पठण…)

खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी आमदारांकडे दुर्लक्ष करून तीन ब्लॉक अध्यक्षांसह 116 बूथ अध्यक्ष आणि 16 झोन अध्यक्षांची बदली केल्याचा आरोप आमदारांनी केला आहे. महुआ यांनी आपल्या विरोधी गटांना भडकावून नादिया जिल्ह्याचे राजकारण तापवले असल्याचेही सांगितले जात आहे. आगामी 2026 च्या बंगालच्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदारांना काढून तृणमूलचे उमेदवार बनवेल, असे आश्वासनही अनेक ब्लॉकच्या नेत्यांना देत आहे. खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) या जिल्ह्यातील एकाही भाजपाविरोधी कार्यक्रमात दिसत नसल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे. उलट पक्षाच्याच आमदारांच्या विरोधात काम करत असल्याचेही पत्रात म्हटले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.