महाराष्ट्र विधानसभा नियम ११० अन्वये शासकीय ठरावात औरंगाबाद शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव’, तसेच नवी मुंबई येथील विमानतळाला ‘लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ’ अशा नावांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
( हेही वाचा : राज्यावरील कर्ज १४.२३ टक्क्यांनी वाढले; कॅगच्या अहवालातून उघड)
या नामांतराची शिफारस केंद्र सरकारला करण्याचा शासकीय ठराव विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर विधानपरिषदेत सभागृह नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला.
विधिमंडळात बाळासाहेबांचे तैलचित्र लावणार
विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. पुढील तीन महिन्यांत हे तैलचित्र लावण्याचे काम पूर्ण करणार असल्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली.
Join Our WhatsApp Community